शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

 नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 21:45 IST

ज्येष्ठ पत्रकार अनिल हरिभाऊ महात्मे यांचे गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ ते ६७ वर्षांचे होते़

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शोकसंवेदना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ पत्रकार अनिल हरिभाऊ महात्मे यांचे गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ ते ६७ वर्षांचे होते़ त्यांच्यामागे पत्नी डा़ॅ आसावरी महात्मे, मुलगा अभिनंदन, दोन मुली अनुभूती व डॉ. प्रज्ञा देवव्रत बेगडे आणि नातवंडासह मोठा आप्तपरिवार आहे़दिवंगत महात्मे हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी होते़ त्यांनी नागपुरातील महासागर या दैनिकातून पत्रकारितेला सुरवात केली़ ते नागपूर पत्रिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होते़ त्यानंतर निर्मल महाराष्ट्र, जनवाद आणि सकाळमध्ये काम केले़ मध्यंतरी त्यांनी दखल नावाचे साप्ताहिकही चालविले़ त्यांनी आपल्या कारकिर्दीत कृषी पत्रकारितेला नवा आयाम दिला़ त्यांना कृषी मित्र पुरस्कार प्राप्त झाला होता़ साठी ओलांडल्यानंतरही त्यांनी शिकण्याची जिद्द सोडली नाही़ दोन वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकारितेची पदवी पूर्ण केली़ त्यांनी कृषी संपदा, रायटरमध्येही काम केले़ अनेक संस्था संघटनांसह नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी राहिलेत़पत्रकार सहनिवास, महाराजबाग या निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघाली व अंबाझरी घाटावर विद्युत शवदाहिनीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजित देशमुख होते़ यावेळी डॉ़ शरद निंबाळकर, तानाजी वनवे, रमेश गजबे, जैन समाजाचे मारोतकर, विजय जावंधिया, प्रा़ शरद पाटील, शरद चौधरी, तुषार कोहळे, विनोद देशमुख, खान नायडू, विलास कालेकर, प्रा़ भाऊ भोगे, श्रीनिवास खांदेवाले, दिलीप गोडे, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, श्रीपाद अपराजित, भास्कर लोंढे, दिलीप तिखिले यांची उपस्थिती होती़ यावेळी इंडियन मीडिया जर्नालिस्टचे बाला भास्कर आणि इंडियन फेडरेशन आॅफ वर्कींग जर्नालिस्टचे विक्रम राव यांनी भ्रमणध्वनीवरून शोकसंवेदना व्यक्त केल्या़ शोकसभेचे संचालन प्रा़ जवाहर चरडे यांनी केले़मुख्यमंत्री यांच्या शोकसंवेदनाअनिल महात्मे यांनी पत्रकारितेत दिलेले योगदान मोलाचे आहे. एक साक्षेपी संपादक आणि व्यासंगी लेखक म्हणून ते कायम स्मरणात राहतील. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली.

 

 

टॅग्स :Deathमृत्यूJournalistपत्रकार