शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

नागपुरात सेल्फीच्या नादात तरुणाने जीव गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 2:00 PM

शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नागपुरातील अनेक नाल्यांना पूर आला आहे. अशा वेगाने वाहत्या नाल्याच्या पाण्यात उभे राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले.

ठळक मुद्देनाल्याच्या पुरात वाहून गेला हुडकेश्वर ठाण्यात नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नागपुरातील अनेक नाल्यांना पूर आला आहे. अशा वेगाने वाहत्या नाल्याच्या पाण्यात उभे राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तो तरुण नाल्यात वाहून गेला. शुक्रवारी सकाळी १०. ३० च्या सुमारास ही घटना घडली. निलेश होलीराम सावके (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सावरबांधे लेआऊटमध्ये राहत होता.शुक्रवारी नागपुरात पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. संपूर्ण शहरच जलमय झाले होते. शहराच्या सीमेलगतच्या वस्त्या, झोपडपट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. नदी, नाले दुथडी भरून वाहत असताना निलेश सावके हा हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौलतनगर, आराधना को-आॅपरेटीव्ह सोसायटीजवळच्या नाल्याला आलेला पूर पहायला गेला. तेथे त्याने नाल्याच्या काठावर पाण्यात उभे होऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. सेल्फीच्या नादात निलेशला काही भान उरले नाही आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहत गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी ४.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. माहिती कळताच हुडकेश्वर पोलिसांनी होलीराम मारोतराव सावके (वय ५६) यांच्या तक्रारीवरून प्रकरणाची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Selfieसेल्फीDeathमृत्यू