शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

नागपुरात रायफल, ३० काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:18 PM

लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान एका इंडिका कारला अडवून तीन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून एक रायफल आणि ३० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देतीन आरोपी गजाआड : लकडगंज पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान एका इंडिका कारला अडवून तीन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून एक रायफल आणि ३० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.एमएच ३१/ सीएम ३१५१ क्रमांकाच्या इंडिका कारमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र घेऊन काही आरोपी सेंट्रल एव्हेन्यूकडे जात असल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच धावपळ करून सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान प्रजापती चौकाजवळ कार अडवली. त्यात अभिजित सोमनाथ पांडे (वय २९), जगदीश काशीप्रसाद पांडे (वय १९, दोघेही रा. स्वामी नारायण मंदिराजवळ, वाठोडा) आणि शाहदाब ऊर्फ नाझिर समशेर खान (वय २०,रा . कळमना)हे तीन गुन्हेगार बसून होते. पोलिसांनी त्यांना कारबाहेर बोलवून कारची झडती घेतली असता त्यात एक रायफल आणि ३० काडतूसं पोलिसांना मिळाली. त्यामुळे कारसह आरोपींना लकडगंज ठाण्यात आणले. या रायफलची बनावट लक्षात आली नाही. रायफलची बनावट विदेशीसारखी दिसत असल्याने शहरात लकडगंज पोलिसांनी एके ४७ पकडल्याची अफवा पसरली. परिणामी सर्वत्र खळबळ उडाली.दरम्यान, ठाणेदार संतोष खांडेकर यांच्याकडून माहिती कळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, एसीपी वालचंद मुंडे लकडगंज ठाण्यात पोहचले. त्यांनी शस्त्र विशेषज्ञांनाही पाचारण केले. रायफलची पाहणी केल्यानंतर ती पॉइंट ३१५ बोल्ट अ‍ॅक्शन स्पोर्ट रायफल असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरील मजकूर बघता ती इंडियन आॅर्डनन्स फॅक्टरीत बनविण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.कशासाठी, कठे जात होते ?आरोपी अभिजित हा या टोळीचा सूत्रधार असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. त्याचे वडील चौकीदारी करतात. आपण एक महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशात मूळगावी गेलो होतो. तेथे १० हजारांत ही रायफल आणि काडतूस विकत घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. घरच्या मंडळींनी विरोध केल्याने कारमध्ये रायफल आणि काडतूस ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, त्याच्या कथनावर पोलिसांचा विश्वास नाही. मोठ्या प्रमाणात काडतूस आणि रायफल घेऊन आरोपी नेमके कुठे आणि कशासाठी जात होते, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक