नागपूरकरांनो, आता वापरा 'माय नागपूर व्हॉट्सॲप चॅटबोट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:30 IST2025-04-16T18:29:39+5:302025-04-16T18:30:01+5:30
सुविधांच्या लाभासाठी सेवा: आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ

Nagpur residents, now use 'My Nagpur WhatsApp Chatbot'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेने नागरिकांसाठी एक महत्त्वाची डिजिटल सेवा सुरू केली आहे. आता 'माय नागपूर एनएमसी व्हॉट्सअॅप चॅटबोट' या नावाने नागपूरकरांना अनेक सुविधा घरबसल्या, फक्त व्हॉट्सअॅपद्वारे उपलब्ध होणार आहेत. मंगळवारी या सेवेचा शुभारंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात झाला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त मिलिंद मेश्राम आणि माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख स्वप्निल लोखंडे उपस्थित होते. ही सुविधा नागपूर महापालिकेच्या डिजिटल इंडिया दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असून, नागपूरकर नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे.
या सुविधेचे हे असतील फायदे
- नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात येण्याची गरज नाही.
- सर्व माहिती व सेवा घरबसल्या उपलब्ध
- वेळेची बचत आणि पारदर्शकता
- आपली मालमत्ता व पाण्याच्या देयकांची स्थिती समजणे सोपे होईल.
चॅटबोटच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा
- मालमत्ता कराची माहिती व भरणा
- यूपीआय नंबर टाकून कर भरणा
- चालू वर्षाचे मागणी देयक
- सवलती व दंडाची माहिती
- ऑनलाइन भरणा लिंक
- थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
- ग्राहक क्रमांक टाकून थकबाकीची माहिती
- मागील भरणा तपशील
- ऑनलाइन पाणीपट्टी भरणा लिंक