शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

नागपूर रेल्वे स्टेशनचे होणार ‘पीपीपी’तून आधुनिकीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 3:47 AM

प्रवाशांना विकास शुल्क आकारून खर्चाची वसुली : अमृतसर, साबरमती आणि ग्वाल्हेर स्थानकांचाही समावेश

संतोष ठाकूर

नवी दिल्ली : सरकार आणि खासगी उद्योगांच्या भागिदारीतून (पीपीपी मॉडेल) नागपूरसह देशातील चार रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व विकास करण्याच्या प्रायोगिक योजनेस रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असून या कामासाठी निविदा जारी केल्या आहेत. नागपूरखेरीज अमृतसर, साबरमती आणि ग्वाल्हेर या रेल्वे स्थानकांचा या योजनेत समावेश आहे.

या रेल्वे स्थानकांचे अशा प्रकारे आधुनिकीकरण व विकास झाल्यानंतर या स्थानकांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना विमानतळांवर आकारणी केली जाते त्याप्रमाणे ‘डेव्हलपमेंट फी’ किंवा ‘यूजर चार्ज’च्या स्वरूपात वेगळी रक्कम मोजावी लागेल. ही जास्तीची रक्कम या स्थानकांपासून प्रवास सुरु होणाºया किंवा संपणाºया प्रवाशांच्या तिकिटामध्येच अंतर्भूत केली जाईल. रेल्वे प्रशासनाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, नागपूर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण व तेथील सेवांचा विकास करण्यासाठी ‘पीपीपी’ योजनेत एकूण ४१२ कोटी रुपये खर्च केले जातील. यापैकी ३७२ कोटी रुपये रेल्वे स्थानकाच्या इमारतीची पुनर्बांधणीसाठी व ४० कोटी रुपये अन्य सेवांसाठी खर्च होतील. निविदा मंजूर झाल्यावर ज्या खासगी कंपनीस हे काम दिले जाईल तिला ‘डेव्हलपमेंट फी’ वसूल करण्याचे ९९ वर्षांचे अधिकार दिले जातील. या अधिकाºयाने असेही सांगितले की, रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण अंदाडे चार- साडेचार वर्षे लागतील व ते झाल्यानंतरच ‘यूजर चार्ज’ वसूल केला जाईल.. ‘यूजर चार्ज’ किती असेल, तो सर्व श्रेणींच्या प्रवाशांना लागू असेल का की सर्वसामान्य वर्ग व दैनिक पासाचे ्परवासी त्यातून वगळले जातील, हे अद्याप ठरलेले नाही. याचा निर्णय स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल.च्हे काम करताना नागपूर स्टेशनचा ‘ऐतिहासिक लूक’ तसाच ठेवला जाईल.च्स्टेशनमध्ये प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र रस्ते असतील.च्स्टेशनमध्ये प्रवेशाआधी स्वतंत्र ‘वेटिंग एरिया’ असेल.

टॅग्स :nagpurनागपूरPublic Transportसार्वजनिक वाहतूकrailwayरेल्वे