शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

आरोपीने आयुष्यात कधीच न केलेली गोष्ट केली अन्... नागपुरातील हायप्रोफाईल हत्या प्रकरण असे आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 16:02 IST

नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात आरोपीच्या एका चुकीमुळे पोलिसांनी या प्रकरणाचे बिंग फोडले आहे.

Purushottam Puttewar Death Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच नागपूरातही एका वृद्ध व्यक्तीची गाडीने धडक देऊन हत्या करण्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उजेडात आलं होतं. सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रनचे असल्याचे वाटलं होतं. मात्र तपासानंतर हा सगळा बनाव रचल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आणखी तपासानंतर या प्रकरणा हळूहळू अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. वृद्ध व्यक्तीची त्यांच्याच सुनेने पैशांसाठी हत्या केल्याची माहिती अखेर पोलिसांनी दिली. सरकारी अधिकारी असलेल्या सूनेनं सुपारी देऊन सासऱ्यांची हत्या केली. या हत्या प्रकरणात महिलेसह तिचा भाऊ आणि हत्या करणाऱ्यांना अटक केली.

पुरुषोत्तम पुट्टेवार असे हत्या झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव असून अर्चना पार्लेवार पुट्टेवार असे सूनेचं नाव आहे. आरोपी सूनेनं सासऱ्यांची हत्या करण्यासाठी तब्बल १७ लाखांची सुपारी दिली होती. संपत्तीसाठी सासऱ्याला कारनं उडविण्याची सुपारी अर्चना पुट्टेवार यांनी दिली. ड्रायव्हर   अर्चना यांनी सार्थक बागडेच्या माध्यमातून त्याचे मित्र निरज निमजे आणि सचिन धार्मिकला सासरे पुरुषोत्तम यांची हत्या करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोपींनी पुरुषोत्तम यांना गाडीने उडवले आणि त्यांची हत्या केली. सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रनचे वाटत होते. मात्र कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केल्यानंतर गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा तपास सुरु केला.

तांत्रिक तपासामध्ये ही हत्या असल्याचे शेवटी उघड झाले. सुपारी देऊन केलेली हत्या आहे हे पोलीस तपासांत समोर आलं.  २२ मे रोजी पुरुषोत्त पुट्टेवार हे त्यांच्या आजारी पत्नीला भेट घेऊन घरी जात होते. त्यावेळी मानेवाडा परिसरातील बालाजी नगर इथे एका कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली. या धडकेनंतर पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यांचा पुट्टेवार यांचा मुलगा आणि अर्चना पुट्टेवारचा पती मनिष पुट्टेवार यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिट अँड रन प्रकरणात कार चालक निरज निमजेला अटक केली.

मात्र पोलिसांना या प्रकरणात संशय आल्याने त्यांनी अधिक तपास केला तेव्हा ही हत्या असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील मास्टरमाईंड पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना पार्लेवार पुट्टेवार असल्याचं तपासात समोर आलं. अर्चना पार्लेवार पुट्टेवार या  गडचिरोलीतील नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत.

आरोपींचे बिंग कसे फुटलं?

अर्चना पुट्टेवार यांच्या चालकाचा मित्र निरज निमजे याच्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले. पुरुषोत्तम यांच्या हत्येसाठी निरजला भरपूर पैसे मिळाले होते. त्यामुळे कधीही कोणालाही दारू न पाजणारा, कधी पार्ट्या न देणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला,  महागड्या दारु पिण्यासाठी मित्रांना विचारु लागला होता. त्यामुळे लोकांना त्याच्यावर संशय येऊ लागला. पोलिसांना खबऱ्यांमार्फत त्याच्याकडे भरपूर पैसे आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी निरजला ताब्यात घेऊन चौकशी सुरु करताच त्याने ही सुनियोजित हत्या असल्याचे सांगून टाकले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघात