नागपूरच्या एम्प्रेस मॉलची ४८३ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची ‘पीएमएलए’ अंतर्गत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 04:42 IST2019-05-15T04:42:02+5:302019-05-15T04:42:57+5:30
ईडीच्या नागपूर विभागाने मंगळवारी केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.

नागपूरच्या एम्प्रेस मॉलची ४८३ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची ‘पीएमएलए’ अंतर्गत कारवाई
नागपूर : ईडीच्या नागपूर विभागाने मंगळवारी केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.
जप्त संपत्तीमध्ये एम्प्रेस मॉलमधील २ लाख ७० हजार ३७४ चौरस फूट जागेचा समावेश आहे. २००२ मध्ये शुक्रवारी तलावाजवळील एम्प्रेस मिल बंद झाल्यानंतर केएसएल इंडस्ट्रीजने मिलची जागा खरेदी केली आणि त्यावर निवासी संकुल व एम्प्रेस मॉल उभारले. केएसएल इंडस्ट्रीजशी संबंधित उद्योजक प्रवीणकुमार तायल हे पूर्वी बँक आॅफ राजस्थानचे अध्यक्ष होते. या समूहाने पुलगाव आणि कळमेश्वर येथील बंद झालेली टेक्सटाइल मिल २०१० मध्ये विकत घेतली होती. त्यानंतर जमिनीचा वापर व्यावसायिक आणि निवासी परिसरासाठी केला होता.
ईडीने म्हटले आहे की, तायल समूहांतर्गत अॅक्टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, जयभारत टेक्सटाइल्स अॅण्ड रियल इस्टेट, केकेटीएल व एक्के नीट (इंडिया) या कंपन्यांनी २००८ मध्ये बँक आॅफ इंडिया व आंध्र बँकेकडून ५२४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचा एनपीएमध्ये (पान ३ वर)