शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा फेरफटका आणि विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:32 IST

कॉलेजियन्सचा घोळका बघून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यातील पालक जागा होतो. १५ ते २० मिनिटांचा हा रस्त्यावरचा क्लास विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारा ठरतो.

ठळक मुद्देवळण देणारा धडाविद्यार्थ्यांचा संकल्पसूरआम्हालाही पोलीस बनायचेय!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वायुसेना नगराचा परिसर... हिरवळ अन् स्वच्छंद तरुणाई ... थोड्या थोड्या अंतरावर प्रेमीयुगुल अन् काही ठिकाणी विद्यार्थी मित्रांचे घोळके. सहजसुलभ गप्पाटप्पा अन् गंमतजम्मत रंगात आलेली. तेवढ्यात पोलीस आयुक्तांचे वाहन तेथून जाते. कॉलेजियन्सचा घोळका बघून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यातील पालक जागा होतो. आपले वाहन थांबवण्याचा इशारा करून ते लगेच वाहनातून खाली उतरतात. त्यांच्या मागेपुढे असलेला पोलीस ताफाही उतरतो. डॉ. उपाध्याय विद्यार्थ्यांच्या घोळक्याकडे पावलं टाकतात. पोलिसांचा ताफा अन् शहर पोलीस दलाचे प्रमुख आपल्याकडे येताना बघून घोळक्यातील विद्यार्थी काहीसे कावरेबावरे झालेले. दडपणात आलेले. त्यांची ती अवस्था लक्षात घेत डॉ. उपाध्यात चिरपरिचित स्माईल देत विद्यार्थ्यांवरील दडपण दूर करतात. हाय, हॅलो करीत ‘तुम्ही कॉलेज सोडून इकडे काय करता’ वगैरे सहजपणे चौकशी करतात. फारसे उपदेशाचे डोज देण्याऐवजी हलकी फुलकी चर्चा करून आता वर्गाला दांडी मारली तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम कसे होतील. आज शिकविल्या गेलेल्या ज्ञानापासून तुम्ही कसे वंचित झाला, ते प्रभावीपणे पटवून देतात. पोलीस दलाचा प्रमूख अगदी मित्रासारखा गप्पा करीत असल्याने विद्यार्थ्यांवरील दडपण कधीचेच पळालेले असते. शिवाय एक मार्गदर्शक लाभल्याची भावनाही त्यांच्यात रुजते. १५ ते २० मिनिटांचा हा रस्त्यावरचा क्लास आयुष्याला वळण देणारा ठरतो. एक वेगळा धडा मिळाल्याची विद्यार्थ्यांमधून तात्काळ प्रतिक्रिया उमटते. क्लास संपतो अन् एकसाथ सगळ्यांचा सूर निघतो... ‘सर, आम्हीही आता मन लावून शिकणार, तुमच्यासारखे पोलीस अधिकारी बनणार... !’ त्यांचा हा संकल्पसूर पोलीस आयुक्तांच्या चेहऱ्यावरील हास्य खुलविणारा ठरतो.

सेल्फी व्हायरलही झाली.दहा दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले डॉ. उपाध्याय रोज थोडा वेळ काढून शहरातील विविध भागांचा फेरफटका मारतात. शहरातील कायदा अन् सुव्यवस्थेची स्थिती बघण्याची त्यांची ही शैली आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे ते वायुसेना नगरातून निघाले अन् वर्गाला दांडी मारणाºया विद्यार्थ्यांचा त्यांनी चक्क रस्त्यावरच क्लास घेतला. पोलीस दिसला की दूर पळणाºया तरुणाईचा अशा पद्धतीने विश्वास जिंकण्याची डॉ. उपाध्याय यांची शैली विद्यार्थ्यांना प्रेमात पाडणारीही ठरली. नंतर सेल्फी झाली अन् ती व्हायरलही झाली.

टॅग्स :Policeपोलिस