शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:01 IST

शहरातील विविध भागातून दुचाक्या चोरून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात अखेर नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या टोळीच्या ताब्यातून चोरीची ३३ वाहने जप्त करण्यात आली. आणखी अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देचोरीच्या ३३ दुचाक्या जप्त : नंदनवन पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागातून दुचाक्या चोरून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात अखेर नंदनवन पोलिसांनी यश मिळवले. या टोळीच्या ताब्यातून चोरीची ३३ वाहने जप्त करण्यात आली. आणखी अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.नंदनवनच्या दर्शन कॉलनीत राहणारे अक्षय सुधाकर रामटेके यांची दुचाकी ७ ते ८ सप्टेंबरच्या दरम्यान चोरीला गेली होती. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. दोन दिवसांपूर्वी हिवरी नगरात शुभम महेंद्र मराठे (वय २५, रा. पडोळेनगर, नंदनवन) हा दुचाकी चोरण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याने दुचाकीचोरीची कबुली देऊन साथीदार अनिल अशोक ढोके (वय २४, रा. निमखेडा, पारशिवनी) तसेच साहिब ऊर्फ साहील खान साहीद खान (वय ३०, रा. गौसिया कॉलनी, हुडकेश्वर) यांची नावे सांगितली. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली. चौकशीत या टोळीने नंदनवनमध्ये १२, सक्करदरात २, लकडगंजमध्ये २, कळमना १ आणि रायपूरमध्ये १ असे १८ दुचाकीचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली.नाल्याला बनविले पार्किंग स्थळउपरोक्त चोरट्यांनी पारशिवनी जवळच्या एका नाल्याला पार्किंग स्थळ बनविले होते. तेथे त्यांनी चोरीच्या ३३ दुचाक्या लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. त्याची किंमत १४ लाख, ७० हजार रुपये आहे. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण, द्वितीय निरीक्षक मुकुंद साळवे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक धाडगे, उपनिरीक्षक थोरात, एस. डी. जायभाये, हवालदार सचिन श्रीकांत, अमोल भीमराव, शिपायी दीपक, पंकज प्रवीण, अभय अणि महिला शिपाई रेणुका यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी