नागपुरातील पेट्रोल पंप दरोडा, खून प्रकरण : उत्कृष्ट तपासासाठी पोलिसांना एक लाखाचा रिवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:14 PM2020-05-23T21:14:38+5:302020-05-23T21:17:35+5:30

रोकड लुटण्याच्या इराद्याने पेट्रोल पंपावर दरोडा घालून एकाची हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी करणारा खतरनाक गुन्हेगार सागर बावरी अजूनही फरार आहे. दरम्यान, कोणताही धागा हातात नसताना या प्रकरणाचा अवघ्या २४ तासात छडा लावून सहापैकी पाच आरोपींना अटक करण्याची उत्कृष्ट कामगिरी बजावणारे एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि त्यांच्या पथकाला पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक लाख रुपयांचा कॅश रिवॉर्ड आणि प्रमाणपत्र शनिवारी जाहीर केले आहे.

Nagpur petrol pump robbery, murder case: One lakh reward to police for excellent investigation | नागपुरातील पेट्रोल पंप दरोडा, खून प्रकरण : उत्कृष्ट तपासासाठी पोलिसांना एक लाखाचा रिवॉर्ड

नागपुरातील पेट्रोल पंप दरोडा, खून प्रकरण : उत्कृष्ट तपासासाठी पोलिसांना एक लाखाचा रिवॉर्ड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोकड लुटण्याच्या इराद्याने पेट्रोल पंपावर दरोडा घालून एकाची हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी करणारा खतरनाक गुन्हेगार सागर बावरी अजूनही फरार आहे. दरम्यान, कोणताही धागा हातात नसताना या प्रकरणाचा अवघ्या २४ तासात छडा लावून सहापैकी पाच आरोपींना अटक करण्याची उत्कृष्ट कामगिरी बजावणारे एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि त्यांच्या पथकाला पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक लाख रुपयांचा कॅश रिवॉर्ड आणि प्रमाणपत्र शनिवारी जाहीर केले आहे.
गुरुवारी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान हिंगणा येथील खतरनाक गुन्हेगार सागर बावरी याने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने हिंगणा एमआयडीसी परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा घातला होता. पंपावरचे कर्मचारी पंढरी श्रीरामजी भांडारकर (वय ६१, रा. वैभवनगरी, वानाडोंगरी) आणि लीलाधर मारोतराव गोहते ( वय ५३, पूजा ले-आऊट, जयताळा) या दोघांवर कुख्यात बावरीने कुº­हाडीचे घाव घातले होते. त्यामुळे भांडारकर जागीच गतप्राण झाले तर गोहते अजूनही गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या आणि पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. कोणताही पुरावा हाती नसताना त्यांनी अवघ्या २४ तासात या दरोड्याचा पर्दाफाश करून कुख्यात बावरीसोबत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाच आरोपींना अटक केली. बावरी अद्याप फरार आहे अटक करण्यात आलेल्या पैकी अक्षय जाधव अरुण पाल आणि राहुल सुरेश राऊत या तिघांना कोर्टात हजर करून त्यांचा पोलिसांनी २७ मे पर्यंत पीसीआर मिळवला. या गुन्ह्याचा सूत्रधार बावरी मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान गुन्ह्याशी संबंधित कोणताही धागादोरा हातात नसताना उत्कृष्टपणे तपास केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी एमआयडीसी पोलिसांना एक लाख रुपयांचा कॅश रिवॉर्ड जाहीर केला आहे.

आरोपीची बनवाबनवी
या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी राहुल राऊत हा पोलिसाशी डावबाजी खेळला. आपले वय १७ वर्षे ८ महिने आहे असे सांगून, त्याने बालगुन्हेगार म्हणून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही सुरुवातीला त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला फारशी विचारपूस केली नाही. मात्र त्याची कागदपत्रे तपासली असता तो १८ वर्षे ८ महिने वयाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक करून न्यायालयात सादर केले.

Web Title: Nagpur petrol pump robbery, murder case: One lakh reward to police for excellent investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.