शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूर जिल्ह्यात ३९ टक्के शेतकरी कुटुंबीयच मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 20:04 IST

नागपूर जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१४ पासून जिल्ह्यामध्ये २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३९ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्या वाढीस : साडेचार वर्षांत २४७ आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१४ पासून जिल्ह्यामध्ये २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३९ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. ३० जून २०१८ पर्यंत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१४ ते जून २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ ९६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल ६१ टक्के म्हणजेच १४९ प्रकरणे अपात्र ठरली. २ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण ९६ लाख रुपयांची मदत देण्यात आली.साडेसतरा वर्षात ७२३ आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार २००१ ते जून २०१८ या साडेसतरा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये ७२३ शेतकºयांनी आत्महत्या केली. यातील २७० म्हणजेच २२० म्हणजेच ३७ टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली. तर ४५१ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले.२०१० पासूनची आकडेवारीवर्ष          आत्महत्या         पात्र        अपात्र२०१०           ६२               २३           ३९२०११           ३६               १३            २३२०१२           २८              १५            १३२०१३           २७              ९              १८२०१४           ६१              २३            ३८२०१५           ५५             २८           २७२०१६           ६६            २५           ४१२०१७           ४३            १४            २९२०१८ (जूनपर्यंत) २२     ६              १४मदतीबाबत १५ दिवसांच्या आत निर्णय अनिवार्यराज्य शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत मदतीबाबत निर्णय घेणे अनिवार्य आहे. तहसीलदार, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष आत्महत्येच्या जागी भेट दिल्यानंतर घटना झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा. त्यानंतर       जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मदतीबाबत १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर