नागपुरात दिवसभर उसंत, रात्री धाे-धाे बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 00:04 IST2021-07-29T00:03:56+5:302021-07-29T00:04:22+5:30
Rain all night रात्री ९ वाजतानंतर वातावरण बदलले आणि धाे-धाे पावसाला सुरुवात झाली. १५-२० मिनिट सरी काेसळल्यानंतर पाऊस थाेडा थांबला पण त्यानंतर पुन्हा जाेर धरला, जाे उशिरा रात्रीपर्यंत सुरू हाेता.

नागपुरात दिवसभर उसंत, रात्री धाे-धाे बरसला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ढगाळ वातावरण असूनही दिवसभर उसंत देणाऱ्या पावसाने रात्री जाेरदार हजेरी लावली. दिवसा आकाशात काळे ढग दाटले हाेते पण थाेड्या वेळाची रिमझिम साेडता उघाड कायम हाेता. मात्र रात्री ९ वाजतानंतर वातावरण बदलले आणि धाे-धाे पावसाला सुरुवात झाली. १५-२० मिनिट सरी काेसळल्यानंतर पाऊस थाेडा थांबला पण त्यानंतर पुन्हा जाेर धरला, जाे उशिरा रात्रीपर्यंत सुरू हाेता.
मंगळवारीच हवामान विभागाने जुलैच्या शेवटी मुसळधार पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात वातावरणाने कूस बदलली आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जूनपासून आतापर्यंत नागपुरात ५४२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली असून ती सामान्यपेक्षा २३ टक्के अधिक आहे. हवामन विभागाच्या अंदाजानुसार पाऊस बरसला तर पावसाचा आकडा ५७ टक्क्यांच्या पार जाणार आहे.
दरम्यान गेल्या २४ तासात गाेंदियामध्ये सर्वाधिक ३१.२ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यानंतर यवतमाळ १०.२ मिमी, गडचिराेली ६.४ मिमी, बुलडाणा ५ मिमी, अकाेला १.२ मिमी तर अमरावतीत १ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. पुढचे चार दिवस नागपूर, चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा जिल्ह्यात एकदाेन ठिकाणी जाेरदार पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आजचा जलसाठा
अमरावती विभाग २०२३.१३ दलघमी ५९.६७ टक्के
नागपूर विभाग २३१७.३७ दलघमी ४४.४ टक्के