शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

नागपूर मनपा व नासुप्रच्या वादात विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:18 PM

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमित व विकसित केलेल्या १५४ अभिन्यासांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याला नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. यातील काही अभिन्यास हस्तांरण करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. परंतु २३३ व १५४ अभिन्यासांना अद्याप मंजुरी दिलेली नाही. महापालिका व नासुप्रच्या वादात या अभिन्यासातील शेकडो वस्त्यांतील कामांना मंजुरी मिळत नसल्याने विकास रखडला आहे.

ठळक मुद्देतरतूद असूनही मंजुरी नाही : २३३ व १५४ अभिन्यासातील रस्ते, गडरलाईनची कामे रोखली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमित व विकसित केलेल्या १५४ अभिन्यासांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याला नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. यातील काही अभिन्यास हस्तांरण करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. परंतु २३३ व १५४ अभिन्यासांना अद्याप मंजुरी दिलेली नाही. महापालिका व नासुप्रच्या वादात या अभिन्यासातील शेकडो वस्त्यांतील कामांना मंजुरी मिळत नसल्याने विकास रखडला आहे.१९०० व ५७२ अभिन्यास नासुप्रने महापालिकेला नागरी सुविधांची देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित केले. २०११ मध्ये महापालिकेने सदर अभिन्यास हस्तांतरण करून घेतले. नागरिकांना  मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी गतकाळात महापालिकेने अशा अभिन्यासात रस्ते, गडरलाईन, नळाच्या लाईन टाकल्या. या आता या भागातील रस्ते दुरुस्तीला आलेले आहेत. गडरलाईन व पाईपलाईन दुरुस्तीला आलेल्या आहेत.अभिन्यासातील विकास कामांसाठी स्थायी समितीने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. नासुप्रने हस्तांतरित केलेल्या परंतु महापालिकेने अद्याप हस्तांतरणाला मंजुरी न दिलेल्या २३३ व १५४ अभिन्यासातील विकास कामांच्या फाईल्स बांधकाम विभागाने रोखल्या आहेत. गतकाळात या अभिन्यासात महापालिकेच्या निधीतून रस्ते, गडरलाईन, पाण्याची लाईन व पथदिवे अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधांची कामे करण्यात आलेली आहेत. गेल्या काही वर्षांत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने डांबरीकरणातील गिट्टी बाहेर पडली असून, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नगरसेवकांनी डांबरी रस्त्यांचे प्रस्ताव सादर केले. परंतु महापालिकेने हस्तांतर करून घेतल्याबाबतचे आधी पत्र द्या त्यानंतरच निधी उपलब्ध होईल, अशी भूमिका बांधकाम विभागाने घेतल्याने स्थायी समितीने तरतूद केली असतानाही मूलभूत सुविधांची कामे रखडलेली आहेत.पूर्व नागपूर, दक्षिण व उत्तर नागपुरातील शेकडो अभिन्यासातील रस्ते नादुरुस्त आहेत. नागरिक त्रस्त झालेले आहेत. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार नगरसेवकांनी डांबरीकरण, नाल्या व गडरलाईन दुरुस्तीच्या फाईल्स स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रशासनाकडे पाठविल्या आहेत. मात्र आधी हस्तांतरणाचे पत्र सादर करा, त्यानंतरच फाईल मंजूर करू, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.नादुरुस्त रस्त्यामुळे नागरिक त्रस्तमहापालिकेच्या निधीतून तसेच आमदार निधीतून मागील काही वर्षांपूर्वी रस्ते व मूलभूत सुविधांची कामे करण्यात आली. आज हे रस्ते नादुरुस्त झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. डांबरीकरण व खड्डे बुजविण्याची गरज आहे. परंतु अधिकाऱ्यांनी हस्तांतरणपत्राची अट घातली आहे. नंदनवन, बुग्गेवार ले-आऊ ट, हुडकेश्वर भागातील गुरुदेवनगर, बांते ले-आऊ ट, श्रीकृष्णनगर, सूर्यनगर, शेषनगर, दिघोरी भागातील वस्त्या, पारडी भागातील नेताजीनगर यासह अनेक वस्त्यांतील फाईल्स रोखल्या आहेत.आधी विकास कामे कशी केली?२३३ व १४५ अभिन्यासातील विकास कामांवर गतकाळात महापालिकेच्या तिजोरीतून निधी खर्च करण्यात आला आहे. त्यावेळी हस्तांतरणपत्राची गरज भासली नाही. मग आताच अशा प्रमाणपत्राची मागणी करणे चुकीचे आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. अभिन्यासातील विकास कामातील अनियमिततेवर चर्चा करण्यासाठी १० डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करणार आहे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास