Nagpur Monsoon Session 2018 : राष्ट्रवादीला नवं बळ; दोन वर्षांनी विधानसभेत पोहोचले 'धडाकेबाज' भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 12:52 IST2018-07-09T12:42:06+5:302018-07-09T12:52:54+5:30
तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळांची विधानभवनात “एन्ट्री”

Nagpur Monsoon Session 2018 : राष्ट्रवादीला नवं बळ; दोन वर्षांनी विधानसभेत पोहोचले 'धडाकेबाज' भुजबळ
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल दोन वर्षानंतर विधानभवनात प्रवेश केला. अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात त्यांनी सहभाग घेतला.
अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कामकाजात भाग घेतला. आज कामकाज सुरू होण्यापूर्वी भुजबळ यांचे विधानभवन परिसरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते आमदार उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी” कौन आया कौन आया, राष्ट्रवादीका शेर आया अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेत आपले इरादे स्पष्ट केले होते. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघाती टीका केली होती. आपण जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत तर बोलणारच आहोत पण जनतेत जाऊनही सरकारला जाब विचारणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला होता.