Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 17:06 IST2025-05-01T17:05:23+5:302025-05-01T17:06:24+5:30
Nagpur Man Drowns In Swimming Pool: नागपुरात मित्राचा वाढदिवस साजरा करताना स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झाला.

Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
नागपुरात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करत असताना स्विमिंग पूलमध्ये पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. पोहायला येत नसतानाही संबंधित तरुणाने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि पाण्यात बुडाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
प्रांजल नितीन रावले (वय, २२) असे स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रांजल मित्रांसह नागपूर शहरातील वाठोडा परिसरातील एका फार्महाऊसमध्ये गेला होता, जिथे त्याच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचा ठरले होते. दरम्यान, बुधवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना प्रांजलने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. परंतु, त्यानंतर तो पाण्यात बुडू लागला. सुरुवातीला मित्रांना वाटले की, तो मस्करी करत आहे. पण तो खरेच बुडत असल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. मित्रांनी ताबडतोब त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांत अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.