नागपूर-कोल्हापूर-नागपूर विमानसेवा १५ मेपासून सुरू; आठवड्यातून पाच दिवस सेवा
By शुभांगी काळमेघ | Updated: April 28, 2025 16:10 IST2025-04-28T16:09:19+5:302025-04-28T16:10:15+5:30
नागपूर-कोल्हापूर विमानसेवा स्टार एअरवेजद्वारे चालवली जाणार : ही सेवा मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या पाच दिवशी सुरु राहणार

Nagpur-Kolhapur-Nagpur flight service to start from May 15; service five days a week
नागपूर : नागपूर-कोल्हापूर-नागपूर मधील बहुप्रतिक्षित विमानसेवा १५ मेपासून सुरू होणार आहे. ही सेवा स्टार एअरवेजद्वारे चालवली जाणार आहे. ही सेवा मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या पाच दिवशी सुरु राहणार आहे. विमानात १२ बिझनेस आणि ६४ इकोनॉमी वर्गातील आसनांची व्यवस्था आहे. या सेवेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार व पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
नागपूरहून सकाळी १० वाजता विमान उड्डाण घेईल आणि सकाळी ११:३० वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचेल. परतीचे विमान दुपारी १२ वाजता कोल्हापूरहून निघून १:३० वाजता नागपूरमध्ये पोहोचेल. ही सेवा सुरू झाल्यामुळे विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
ही नवीन विमानसेवा औद्योगिक व व्यापारी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, कोल्हापूरसारख्या प्रगतीशील शहरासाठी ती विकासाची नवीन दिशा उघडणारी ठरणार आहे.