नागपुरात कपाटातील ६.४९ लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 20:44 IST2019-10-25T20:42:38+5:302019-10-25T20:44:15+5:30
बेडरुमच्या प्लायवूडच्या कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे ६ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात कपाटातील ६.४९ लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेडरुमच्या प्लायवूडच्या कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे ६ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गजानन अपार्टमेंट फ्लॅट नं. ३०१, तिसरा माळा, प्रेमनगर येथे राहणाऱ्या भावना नरेश भट्टी (५५) या आपले दीर आणि सासू यांना घरी ठेवून मुंबईला कुटुंबासह मुलासाठी मुलगी पाहावयास गेल्या होत्या. मुंबईवरून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या बेडरुमच्या प्लायवूडच्या कपाटात ठेवलेले ६ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पाहिले असता कपाटात आढळले नाही. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.