नागपूर राममय ! पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेला मुख्यमंत्री-गडकरींनी ओढला राम रथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 20:12 IST2026-03-26T20:11:53+5:302026-03-26T20:12:58+5:30

Nagpur : उपराजधानीचे मुख्य श्रद्धास्थान असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिराच्या भव्य आणि ऐतिहासिक शोभायात्रेला आज 'जय श्रीराम'च्या जयघोषात सुरुवात झाली.

Nagpur is full of Ram Navami! Chief Minister-Gadkari pull Ram Rath in Poddareshwar Ram temple procession | नागपूर राममय ! पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेला मुख्यमंत्री-गडकरींनी ओढला राम रथ

Nagpur is full of Ram Navami! Chief Minister-Gadkari pull Ram Rath in Poddareshwar Ram temple procession

नागपूर : उपराजधानीचे मुख्य श्रद्धास्थान असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिराच्या भव्य आणि ऐतिहासिक शोभायात्रेला आज 'जय श्रीराम'च्या जयघोषात सुरुवात झाली. या परंपरेचे यंदा ६० वे वर्ष असून, संपूर्ण नागपूर शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः राम रथ ओढून या सोहळ्याचा शुभारंभ केला.

२४ हजार कार्यकर्त्यांची अहोरात्र सेवा

​या भव्य शोभायात्रेच्या नियोजनासाठी शहरातील २८०० संस्थांचे तब्बल २४ हजार कार्यकर्ते सेवा देत आहेत. रस्त्यावरील शिस्त आणि भाविकांची सोय पाहण्यासाठी २ हजार रामभक्तांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

​शस्त्र-शास्त्रांनी सुसज्ज मुख्य रथ

​यंदाच्या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे शस्त्र-शास्त्रांनी सुसज्ज असलेला प्रभू श्रीरामाचा रथ. धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षणाचा संदेश देणाऱ्या या रथावर प्रभू श्रीरामाच्या उत्सव मूर्ती विराजमान आहेत. या रथाचे काम धनराज पंजवानी यांनी केले असून, इंदूरच्या श्याम भाटिया यांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

​९० चित्ररथांचा लवाजमा आणि सांस्कृतिक सोहळा

  • शोभायात्रेत एकूण ९० भव्य चित्ररथांचा समावेश असून, यात विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करण्यात आले आहेत.
  • ३५० हून अधिक कलावंत शंखवादन करत आहेत.
  • १०८ मंगल कलशधारी महिला यात्रेच्या अग्रभागी आहेत.
  • नृत्य पथक, स्केटिंग पथक आणि लोकनृत्यांच्या सादरीकरणाने यात्रेची शोभा वाढली आहे.

 

​शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण

ही शोभायात्रा शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून जात असून, ठिकठिकाणी भाविकांनी रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले आहे. रात्री उशिरा ही शोभायात्रा पुन्हा पोद्दारेश्वर राम मंदिरात पोहोचेल, जिथे महाआरतीने या सोहळ्याचा समारोप होईल

Web Title : नागपुर राममय: मुख्यमंत्री और गडकरी ने रथ खींचा।

Web Summary : नागपुर के पोद्दारेश्वर राम मंदिर की 60वीं भव्य शोभायात्रा शुरू हुई। मुख्यमंत्री फडणवीस और मंत्री गडकरी ने रथ खींचकर उद्घाटन किया। 90 झांकियों, सांस्कृतिक प्रदर्शनों और व्यापक भागीदारी के साथ, शोभायात्रा महा आरती के साथ समाप्त होगी।

Web Title : Nagpur Celebrates Ram: Grand Procession with CM and Gadkari.

Web Summary : Nagpur's Poddareshwar Ram Temple's 60th grand procession began with fervor. Chief Minister Fadnavis and Minister Gadkari inaugurated the event by pulling the chariot. Featuring 90 floats, cultural performances, and widespread participation, the procession will conclude with a Maha Aarti.