नागपूर - हिंगणा मार्गावर टिप्परच्या धडकेत दुचाकीचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:38 IST2018-08-03T23:33:55+5:302018-08-03T23:38:30+5:30
भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. चालक वाहनासह टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा - नागपूर मार्गावरील झोन चौकात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

नागपूर - हिंगणा मार्गावर टिप्परच्या धडकेत दुचाकीचालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. चालक वाहनासह टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा - नागपूर मार्गावरील झोन चौकात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
विक्रमसिंह तिलकधारी यादव (६५, रा. काळमेघनगर, हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. ते एमएच-४०/सी-२३८६ क्रमाकांच्या दुचाकीने हिंगण्याहून काळमेघनगरकडे जात होते. दरम्यान, झोन चौकात मागून वेगात येणाऱ्या एमएच-४९/६७३ क्रमांकाच्या टिप्परने दुचाकीला धडक देत उडविले. त्यात विक्रमसिंग हे वाहनासह टिप्परच्या मागच्या चाकाखाली आले. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच चालक टिप्परसह पळून गेला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून नीलडोह परिसरातून टिप्पर ताब्यात घेतला.