नागपुरात हवालदाराने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:19 IST2021-06-17T00:19:13+5:302021-06-17T00:19:35+5:30

Head Constable , suicide झिंगाबाई टाकळी येथे एका पोलीस हवालदाराने गळफास घेतला.

In Nagpur, the head constable took the gallows | नागपुरात हवालदाराने घेतला गळफास

नागपुरात हवालदाराने घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : झिंगाबाई टाकळी येथे एका पोलीस हवालदाराने गळफास घेतला. प्राथमिक चौकशीत पत्नीच्या मृत्यूमुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नरेंद्र मधुकर तांबुस्कर (५५) रा. वेलकम सोसायटी, झिंगाबाई टाकळी असे मृताचे नाव आहे. तांबुस्कर हे वाडी पोलीस ठाण्यात तैनात होते. अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तेव्हापासून ते मानसिक तणावात होते. असे सांगितले जाते की, त्यांना दारूचे व्यसनही लागले होते. त्यामुळे ते सुटीवर राहायचे. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलगी बीसीसीए करीत आहे. लहान मुलगा वाहन चालक तर मोठा मुलगा बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहे. तिघेही घराबाहेर गेल्यानंतर दुपारी १२ वाजता तांबुस्कर यांनी गळफास घेतला. दुपारी २.१५ वाजता मोठा मुलगा घरी आला तेव्हा त्याला वडील फासावर लटकलेले आढळून आले. पोलिसांना सूचना देण्यात आली. मानकापूरच्या पीआय वैजयंती मांडवघरे, हवालदार प्रमोद दिघोरे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तांबुस्कर यांचा मृतदेह मेयो रुग्णालयात रवाना करीत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: In Nagpur, the head constable took the gallows