नागपुरात युवतीला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:52 IST2019-07-18T23:52:23+5:302019-07-18T23:52:56+5:30
दुचाकीवरील युवतीला एका ट्रकने चिरडले तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. काटोल मार्गावर दुपारी २ च्या सुमारास हा अपघात घडला.

नागपुरात युवतीला ट्रकने चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवरील युवतीला एका ट्रकने चिरडले तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. काटोल मार्गावर दुपारी २ च्या सुमारास हा अपघात घडला. मयुरी सुनील झोड़ापे (वय २०) असे मृत युवतीचे नाव असून जखमीचे नाव
शुभम गंगाधर डोंगरे (वय १८) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही फेटरीचे रहिवासी आहे. दोघे स्कुटीवर बसून गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घराकडे परत जात होते. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने स्कुटीला धडक मारल्याने त्यांचे संतुलन बिघडले आणि ते खाली पडले. भरधाव ट्रकने मयुरीला चिरडले. तर खाली पडून शूभम जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला. गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी ट्रकचालक विनोद नौकरकर याला अटक केली.