Nagpur: नागपूरच्या इतवारीतील पेंटच्या गोदामाला आग

By मंगेश व्यवहारे | Updated: October 10, 2023 11:08 IST2023-10-10T11:08:18+5:302023-10-10T11:08:55+5:30

Nagpur Fire News: इतवारी येथील पेंट च्या गोदामाला मंगळवारी पहाटे आग लागल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. अग्निशमन पथकाला 5 वाजता आगीचा कॉल आला.

Nagpur: Fire breaks out at a paint godown in Itwari, Nagpur | Nagpur: नागपूरच्या इतवारीतील पेंटच्या गोदामाला आग

Nagpur: नागपूरच्या इतवारीतील पेंटच्या गोदामाला आग

- मंगेश व्यवहारे
नागपूर - इतवारी येथील पेंट च्या गोदामाला मंगळवारी पहाटे आग लागल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. अग्निशमन पथकाला 5 वाजता आगीचा कॉल आला. पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीचे धूर निघताना दिसले. पेंटचे गोदाम असल्याने आगीला पोषक असल्यामुळे आगीने चांगलाच भडका घेतला होता. सकाळी 10 वाजेपर्यंत आग नियंत्रणात आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. फक्रुद्दीन हसन अली अँड  कंपनी,होलसेल पेंट विक्री शाॅप, गोदाम नावाने इतवारीच्या लोहा ओळीत ही दुकान आहे. ही व्यापारी पेठ असून येथे दाटीवाटीने दुकाने आणि निवासी संकुल आहे.  सद्या पथकाकदून पंचनामाची प्रक्रिया सुरू  आहे.

Web Title: Nagpur: Fire breaks out at a paint godown in Itwari, Nagpur