Nagpur Crime: मोठ्या भावाच्या बायकोसोबतच लहान भावाचे अनैतिक संबंध, झोपेतच पाडला मुडदा; नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:46 IST2025-08-30T18:14:39+5:302025-08-30T18:46:40+5:30
Nagpur : ही हत्या धाकट्या भावाचे त्याच्या वहिनीशी असलेल्या अनैतिक संबंधातून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस अटक केली

Nagpur Crime: Younger brother had an immoral relationship with his elder brother's wife, committed suicide in his sleep; later...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : थोरल्या भावाने धाकटा भाऊ झोपेत असताना त्याच्या डोक्यावर काठीने वार करून त्याची हत्या केल्याची घटना कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेडी शिवारात घडली असून, गुरुवारी (दि. २८) उघडकीस आली. ही हत्या धाकट्या भावाचे त्याच्या वहिनीशी असलेल्या अनैतिक संबंधातून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस अटक केली आहे.
शिशुपाल गंगाधर पिलाने (४०) असे मृताचे नाव असून, मनोज गंगाधर पिलाने (४१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. दोघेही शिवनी, ता. कुही येथील रहिवासी असून, मागील काही दिवसांपासून खेडी (ता. कुही) येथे राहतात. श्रावण घोरमारे यांचे खेडी शिवारात शेत असून, त्यांच्या शेतालगत असलेल्या पाणी वाहून जाणाऱ्या नालीत गुरुवारी अनोळखी मृतदेह आढळला. त्यामुळे कुही पोलिसांनी पंचनामा करून घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्याची हत्या मृतदेह ताब्यात करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक माहिती आणि संशयाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी मनोजला ताब्यात घेत विचारपूस केली. गुन्ह्याची कबुली देताच त्याला कुही पोलिसांच्या सुपूर्द करत अटक केली.
मृतदेह फेकला नालीत
शिशुपालचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते, याची माहिती मनोजला माहिती होती. तो शनिवारी (दि. २३) रात्री झोपेत असताना मनोजने त्याच्या डोक्यावर काठीने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे पाय दोरीने बांधून मृतदेह खेडी शिवारातील नालीत फेकून दिला, अशी माहिती आरोपी मनोजने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांना दिली.