नागपूरमध्ये खळबळ उडवणारी घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. हल्लेखोरांनी केलेल्या जबर मारहाणीत नितीन शिमले गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
कोतवाली पोलिसांच्या हद्दीमध्ये रविवारी रात्री ११ च्या सुमारास भाजप नगरसेविकेच्या पतीवर त्याच्याच मित्राने प्राणघातक हल्ला केला. निखिल श्याम सिमले (३९), असे जखमीचे नाव असून ते शीतलामाता मंदिराजवळ, जुनी शुक्रवारी येथील रहिवासी आहेत. ते रेशीमबाग प्रभागाच्या नगरसेविका मानसी सिमले यांचे पती आहेत.
हल्ला करण्याचे कारण काय?
त्यांच्यावर आरोपी महेश ऊर्फ सोनू गणेश ठाकरे (३५) याने प्राणघातक हल्ला केला. सिमले व ठाकरे हे जुने मित्र असून ते दोघेही एका हत्याकांडामध्ये आरोपी होते. त्यातून ते निर्दोष सुटले आहेत.
रविवारी रात्री शुक्रवारी तलाव परिसरात त्यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, ठाकरेने सिमले यांच्यावर चाकूने हल्ला केला.
छाती आणि पोटावर वार
त्यांच्या छातीवर व पोटावर चाकूचे वार केले. त्यामुळे सिमले गंभीर जखमी होऊन रक्ताने माखले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस शुक्रवारी तलाव परिसरात पोहोचले व त्यांनी सिमले यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात भरती केले. पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
Web Summary : In Nagpur, BJP corporator Mansi Shimle's husband, Nitin, was attacked by friend Mahesh Thackeray after an argument. Both were acquitted in a past murder case. Thackeray stabbed Shimle in the chest and stomach near Shukrawari Lake, leaving him critically injured. Police are investigating.
Web Summary : नागपुर में भाजपा पार्षद मानसी शिमले के पति नितिन पर दोस्त महेश ठाकरे ने बहस के बाद हमला किया। दोनों पूर्व में एक हत्या के मामले में बरी हो चुके हैं। ठाकरे ने नितिन को चाकू से छाती और पेट में वार किया, जिससे वे गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस जांच कर रही है।