Nagpur Police : १७ पोलीस कर्मचाऱ्यांवर कोसळली निलंबनाची कुऱ्हाड; 'हे' आहे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 17:17 IST2022-04-14T16:39:17+5:302022-04-14T17:17:18+5:30
नागपूर पोलीस दलातील तब्बल १७ कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस १७ निलंबित करण्यात आले आहे.

Nagpur Police : १७ पोलीस कर्मचाऱ्यांवर कोसळली निलंबनाची कुऱ्हाड; 'हे' आहे कारण
नागपूर : नागपूर पोलीस दलातील दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तब्बल १७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. अशाप्रकारे १७ कर्मचारी एकाचवेळी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे
आरोग्य आणि अन्य रजा घेऊन सतत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली होती. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यातील काही कर्मचारी कामावर परतले तर काही कर्चमारी गैरहजर राहीले. याबाबतचे ठळक कारणही ते देऊ शकले नाही. परिणामी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गैरहजर राहणाऱ्या १७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
राज्यातील पोलीस दलासंदर्भात नेहमीच बातम्या येत असतात. पोलिसांच्या बदलीसंदर्भात उचललेले सकारात्मक पाऊल असो वा सुव्यवस्थेबाबतच्या नकारात्मक बातम्या असो नागपूर पोलीस दल कायम चर्चेत असते. तर, आता १७ पोलिसांना एकाचवेळी निलंबित केल्यामुळे नागपूर पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.