नागपुरात कोरोनाने घेतला पुन्हा एका पोलिसाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:41 IST2020-09-14T22:40:01+5:302020-09-14T22:41:17+5:30

सर्वत्र प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाने पुन्हा एका पोलिसांचा बळी घेतला आहे. रवींद्र बारीकराव दमाहे असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते अयोध्या नगरातील साई मंदिराजवळ राहत होते.

In Nagpur, Corona took another police victim | नागपुरात कोरोनाने घेतला पुन्हा एका पोलिसाचा बळी

नागपुरात कोरोनाने घेतला पुन्हा एका पोलिसाचा बळी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सर्वत्र प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाने पुन्हा एका पोलिसांचा बळी घेतला आहे. रवींद्र बारीकराव दमाहे असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते अयोध्या नगरातील साई मंदिराजवळ राहत होते.
४८ वर्षीय दमाहे सक्करदरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना होप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दमाहे यांच्यामागे पत्नी साक्षी तसेच यश आणि लक्ष्य ही दोन मुले तसेच मोठा आप्तपरिवार आहे. शहर पोलीस दलातील कोरोनाचा हा अकरावा बळी आहे. यापूर्वी दहा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शहर पोलिस दलातील एक हजार पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता आहे.

Web Title: In Nagpur, Corona took another police victim