शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकर कलावंतांनी पेललेले ‘नागमंडल’

By admin | Updated: June 12, 2014 01:19 IST

नाट्य कार्यशाळांमधून नाट्याभिनय आणि नाटकांचे तंत्र समजून घेणाऱ्या नव्या दमाच्या कलावंतांनी भव्यदिव्य काहीतरी करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांना गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या ‘नागमंडल’

गिरीश कर्नाड लिखित नाटक : फर्स्ट बेल आॅन स्टेजचे सादरीकरण
नागपूर : नाट्य कार्यशाळांमधून नाट्याभिनय आणि नाटकांचे तंत्र समजून घेणाऱ्या नव्या दमाच्या कलावंतांनी भव्यदिव्य काहीतरी करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांना गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या ‘नागमंडल’ नाटकाचे आव्हान वाटले. या नाटकाचा अभ्यास केला आणि त्यासाठी काय दम लागणार याची जाणीव झाली. पण सर्वच कलावंतांनी सचोटीने प्रयत्न करून हे आव्हान पेलले आणि नागमंडलचा प्रयोग यशस्वी करून दाखविला.
शहरातील युवा रंगकर्मींनी ‘फर्स्ट बेल आॅन स्टेज’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विविध शहरातील रंगकर्मींचे सादरीकरण आणि नवनव्या नाटकाच्या फॉर्मला समजून घेण्याचा, त्यांना अभ्यासण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत आहे. त्या अंतर्गतच नागमंडल या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. साई सभागृहात सादर झालेल्या या प्रयोगाला शहरातील तमाम रंगकर्मी आणि नाट्य रसिकांनी गर्दी केली. हा प्रयोग छिंदवाड्याच्या नाट्यगंगा संस्थेच्यावतीने सादर करण्यात आला.
छिंदवाडा येथे नाट्य चळवळ फारशी जोरात नाही. पण येथील रंगकर्मींनी विविध शिबिरात नाट्यविषयक ज्ञान मिळविले आणि नागमंडलचा प्रयोग परिश्रमाने बसविला. त्यांच्या परिश्रमाची महती आणि सादरीकरणाचा दम माहीत असलेल्या नागपुरातल्या रंगकर्मींनी त्यांना आमंत्रित केले होते. या कलावंतांनी आत्मविश्वासाने हा प्रयोग सादर करून उपस्थितांची दाद घेतली.
एका लोककथेवर आधारित आणि स्त्री-पुरुषांच्या एकनिष्ठतेच्या प्रश्नावर विचार मांडणारे नागमंडल हे केवळ कन्नड भाषेतीलच नव्हे तर भारतातील जवळपास सर्व मान्यताप्राप्त भाषेतून सादर केले गेले आहे. भारतातीलच नव्हे तर इंग्लंड, अमेरिकेतीलही कित्येक विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नागमंडलचा अभ्यासक्रमात समावेश असलेले नाट्य सादर करण्याचे धाडस या युवा मंडळींनी केले़ वैवाहिक जीवनाच्या एका संवेदनशील प्रश्नाला स्पर्श करणारे हे नाटक दोन उपकथांद्वारे पुढे जाते.
नाटकाची शैली लोककथेची असून ती साकारण्यात ही युवा मंडळी यशस्वी ठरली. केतन सोनी, अपूर्वा डोगरवाल, सोनल सूर्यवंशी, रचना, स्वाती चौरसिया, पवन नेमा, निकिता सोनी, विनोद ग्यास, हर्ष नागले, जगदीश वर्मा, सुधीर जैन, विजय गोळे, सचिन दुबे, नितीन जैन, नीतेश मंडराह, भरत गढेवाल, सोनू यादव व विक्की यादव यांनी नाटकात भूमिका केल्या आहेत.(प्रतिनिधी)