Nagpur city will get 100 electric buses | नागपूर शहराला १०० इलेक्ट्रीक बस मिळणार
नागपूर शहराला १०० इलेक्ट्रीक बस मिळणार

ठळक मुद्देनिती आयोगाची मंजुरी : परिवहन विभागाचा मिनी व मिडी बसवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय निती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. यावर महापालिकेला १०० कोटी खर्च करावे लागणार आहे. १२ मीटरच्या स्टँडर्ड बसवर महापालिकेला प्रत्येकी ४५ लाखांचे अनुदान मिळणार आहे. परंतु शहरातील रस्त्यांचा विचार करता महापालिके चा मिनी व मिडी इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याचा विचार आहे.
पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यातूनच नागपूरला १०० इलेक्ट्रीक बस प्राप्त होणार असल्याची माहिती परिवहन सभापती बंटी कुक डे यांनी दिली. परंतु यामुळे महापालिकेवर १०० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. याचा विचार करताऑपरेटची नियुक्ती करून होणाऱ्या प्रति किलोमीटर खर्चा सोबतच हा खर्च करण्याचा विचार आहे. इलेक्ट्रीक बसमुळे महापालिकेला प्रति किलोमीटर खर्च कमी येईल. त्यामुळे डिझेल बसवर होणाºया खर्चात इलेक्ट्रीक बस चालविणे शक्य आहे.
केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत १२ मीटर लांबीच्या स्टँडर्ड बसवर ४५ लाखांचे अनुदान मिळणार आहे. परंतु शहरातील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ व गर्दी विचारात घेता ७ मीटरची मिनी व ९ मिटरची मिडी इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात आहे. तो लवकरच केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे.
रेल्वे स्टेशन, महाल, इतवारी, गांधीबाग व गोळीबार चौक अशा वर्दळीच्या भागातील ६० फूट रुंदीच्या रस्त्यांसाठी मिनी, ८० फूट रुंदीच्या रस्त्यावर मिडी व १०० फुटाहून अधिक रुंदीच्या मार्गावर स्टँडर्ड बसेच चालविण्याचा विचार आहे.
डेपोच्या जागेसाठी नासुप्रकडून सात लाखांची मागणी
नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करून मालमत्ता महापालिकेला हस्तांतरित करण्याची घोषणा केली आहे. परंतु नासुप्र आपल्या मालमत्ता एनएमआरडीएकडे यांच्याकडे हस्तांतरित करीत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथे शहर बस डेपोसाठी जागा उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. परंतु डेपोच्या जागेसाठी नासुप्र महापालिकेला दरमहा सात लाख रुपये भाडे मागत आहे. नासुप्रने डेपोसाठी जागा नाममात्र लीजवर उपलब्ध करावी. अशी मागणी बंटी कुकडे यांनी केली आहे.
वाठोडा येथे १० एकर जागेत बसडेपो
वाठोडा येथे महापालिकेची १० एकर जागा आहे. ही जमीन समतल करून व संरक्षण भिंत उभारून येथे इइलेक्ट्रीक बस डेपो उभारण्याचा प्रस्ताव आहे. आयुक्तांकडे या जागेची मागणी केली आहे. येथे डेपो उभारल्यास महापालिकेच्या खर्चात बचत होणार असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली.

 


Web Title: Nagpur city will get 100 electric buses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.