शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

नागपूर : १ जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवरून आवागमन करताना केवळ फास्टॅग कार्डाद्वारेच ऑनलाईन भुगतान अनिवार्य करण्याच्या केंद्र ...

नागपूर : १ जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवरून आवागमन करताना केवळ फास्टॅग कार्डाद्वारेच ऑनलाईन भुगतान अनिवार्य करण्याच्या केंद्र शासनाच्या नव्या दिशानिर्देशानुसार नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये फास्टॅग कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अत्यंत माफक दरात वैयक्तिक आणि व्यावसायिक श्रेणीच्या चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग सुविधा उपलब्ध करणारी नागपूर नागरिक सहकारी बँक विदर्भातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. त्यासाठी बँकेच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या फास्टॅग विषय केंद्रीय संस्थेकडून परवाना प्राप्त झाला असून या सुविधेच्या योग्य कार्यान्वहनासाठी बँकेने वन-पे सोल्युशन प्रा.लि. यांच्यासोबत सामंजस्य करारही केला आहे. फास्टॅग कार्ड प्राप्त करण्यासाठी चारचाकी वाहनधारकांना बँकेच्या कुठल्याही शाखेत आपले बचत, चालू वा कर्जखात्याच्या माध्यमातून कार्ड प्राप्त करून घेता येईल. बँक खात्यासोबतच त्यांच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा इंजिन आणि चेसिस क्रमांक आदी विवरण देऊन संबंधित वाहन बँक खात्याशी लिंक करताच ग्राहकांना फास्टॅगद्वारे ऑनलाईन टोल भुगतानाचा लाभ घेता येईल. याशिवाय बॅकेने गृह आणि वैयक्तिक उपयोगाच्या वाहन कर्जावरील व्याजदरात लक्षणीय कपात केली असून ८ टक्के व्याजदरात गृहकर्ज आणि ८.९५ टक्के व्याजदरात वाहनकर्ज उपलब्ध केले आहे. सर्व कर्ज प्रकारावरील व्याज आकारणी ही डेली रिड्युसिंग बॅलन्सवर आधारित असल्याने ग्राहकांना त्यांच्या मासिक कर्ज हप्त्यातही सूट मिळत आहे. नव्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे बँकेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष गोडबोले यांनी म्हटले आहे. (वा.प्र.)