नागपूर : चाकूच्या धाकावर कारचालकाला लुटले, पोलिसांनी २४ तासात तुरुंगात टाकले

By दयानंद पाईकराव | Updated: February 19, 2024 16:00 IST2024-02-19T16:00:01+5:302024-02-19T16:00:53+5:30

तीन आरोपींना मानकापूर पोलिसांनी २४ तासाच्या आत गजाआड केले आहे.

Nagpur Car driver robbed at knife point police put him in jail within 24 hours | नागपूर : चाकूच्या धाकावर कारचालकाला लुटले, पोलिसांनी २४ तासात तुरुंगात टाकले

नागपूर : चाकूच्या धाकावर कारचालकाला लुटले, पोलिसांनी २४ तासात तुरुंगात टाकले

नागपूर : चाकुचा धाक दाखवून एका कारचालकाला मारहाण करून कारचे नुकसान करीत १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरन नेणाऱ्या तीन आरोपींना मानकापूर पोलिसांनी २४ तासाच्या आत गजाआड केले आहे.

संकेत दिलीप कनेरे (२४, रा. कोराडी रोड, मानकापूर), तुषार अनिल शर्मा (२२, रा. गंगानगर झाेपडपट्टी, मानकापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांचा एक साथीदार अद्यापही फरार आहे. शनिवारी रात्री ११.३० वाजता मॉरीयन ब्लेस अंतीक (३७, रा. सेंट मार्टीननगर, जरीपटका) हे त्यांची कारने घरी जात होते. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दावत हॉटेलजवळ, सर्व्हिस रोडवर त्यांना तीन अनोळखी व्यक्तींनी थांबविले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मॉरीयन यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील मोबाईल, रोख १७०० रुपये असा एकूण १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला.

आरोपींनी मॉरीयन यांच्या कारच्या काचावर दगड मारून व इंडिकेटर फोडून कारचे नुकसान केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी त्वरीत गुन्ह्याची दखल घेऊन घटनास्थळी भेट देत तांत्रिक तपास करून परिसरात शोध घेतला. पोलिसांनी यातील आरोपी संकेत आणि तुषारला २४ तासाच्या आत अटक करून त्यांच्या विरुद्ध कलम ३९४, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यांचा एक साथीदार फरार असून मानकापूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Nagpur Car driver robbed at knife point police put him in jail within 24 hours