Nagpur Breaking : नागपुरमध्ये मोठी दुर्घटना! पाण्याची टाकी फुटली, ३ कामगार ठार; ८ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:07 IST2025-12-19T13:29:43+5:302025-12-19T14:07:12+5:30
Nagpur : बुटीबोरी एमआयडीसी फेस २ येथील अवाडा सोलर प्लांटमध्ये आज सकाळच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली.

Nagpur Breaking : Major accident in Nagpur! Water tank bursts, 3 workers killed; 8 injured
नागपूर : बुटीबोरी एमआयडीसी फेस २ येथील अवाडा सोलर प्लांटमध्ये आज सकाळच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. प्लांट परिसरातील पाण्याची मोठी टाकी अचानक फुटल्याने झालेल्या या अपघातात ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. मृत कामगारांचे मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या दुर्घटनेमुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून घटनेच्या कारणांची चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.