सावरकरांबाबत अवमानकारक वक्तव्य, राहुल गांधींविरोधात भाजयुमोची पोलिसांत तक्रार
By योगेश पांडे | Updated: November 18, 2022 13:31 IST2022-11-18T13:14:52+5:302022-11-18T13:31:38+5:30
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं

सावरकरांबाबत अवमानकारक वक्तव्य, राहुल गांधींविरोधात भाजयुमोची पोलिसांत तक्रार
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगून वीर सावरकरांचा व हिंदू प्रेमीचा अवमान करण्यात आला आहे असा भाजप नेत्यांचा सूर होता. भाजयुमोतर्फे गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, आ. कृष्णा खोपडे, माजी महापौर अर्चना डेहणकर, चंदन गोस्वामी, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले, ॲड. परिक्षित मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.