शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपुरात पावसामुळे वातावरणात गारवा : तापमान घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:10 AM

पावसामुळे तापमान घटून वातावरणात गारवा पसरला आहे. असह्य उकाड्यातून सुटका झाल्याने शहरवासी सुखावले आहेत.

ठळक मुद्देनागरिकांची असह्य उकाड्यातून सुटका

 लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : पावसामुळे तापमान घटून वातावरणात गारवा पसरला आहे. असह्य उकाड्यातून सुटका झाल्याने शहरवासी सुखावले आहेत.गेल्या २४ तासात तापमान २.२ डिग्रीने कमी झाले. बुधवारी कमाल ३५.९ डिग्री तापमान नोंदले गेले. केवळ दुपारी ऊन व ढगांमुळे थोडा उकाडा जाणवला. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ३.६ मिमी पावसाची नोंद झाली. आर्द्रता ६६ टक्के होती. अफगाणिस्तान व पाकिस्तान सीमेवरील वेस्टर्न डिस्टर्बेंस आणि बंगालची खाडी व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे उत्तर-पश्चिम भारतात वेगवान वादळासह पाऊस पडत आहे. हवामान विभागानुसार, येत्या २४ तासापर्यंत आकाश ढगाळ राहील व हलका पाऊस पडत राहील. वेस्टर्न डिस्टर्बेंस व कमी दबावाचे क्षेत्र पूर्वेकडे वाटचाल करीत आहे. परिणामी, वातावरणातील आर्द्रता कमी होईल. त्यानंतर परत उष्णता वाढायला लागेल. एप्रिलच्या शेवटी व मेमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या २४ तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडला. अमरावतीत १०, बुलडाण्यात ५, यवतमाळमध्ये ३.४ तर, अकोल्यात २.४ मिमि पावसाची नोंद झाली. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये तापमान सामान्यस्तरापेक्षा खाली उतरले.चार दिवसात ८.३ डिग्रीची घटगेल्या चार दिवसात नागपुरातील तापमान वेगात खाली उतरले. १४ एप्रिल रोजी कमाल तापमान ४४.२ डिग्री होते तर, १७ एप्रिल रोजी ३५.९ डिग्री कमाल तापमानाची नोंद झाली. चार दिवसांत कमाल तापमान ८.३ डिग्रीने खाली उतरले.तारीख     कमाल तापमान१४ एप्रिल   ४४.२१५ एप्रिल   ४२.०१६ एप्रिल   ३८.११७ एप्रिल   ३५.९

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानRainपाऊसnagpurनागपूर