शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

नागपूर-अमरावती  मार्गावर चाेरट्यांनी एटीएम फोडून ३५.६४ लाख केले लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 11:28 PM

Thieves broke an ATM, crime news चाेरट्यांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वडधामना येथील तकिया या वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम फाेडून त्यातील ३५ लाख ६४ हजार ९०० रुपये राेख काढून ती चाेरून नेली.

ठळक मुद्दे वडधामना येथील घटना 

लाेकमत न्यूज नेटवर्कवाडी : चाेरट्यांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वडधामना येथील तकिया या वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम फाेडून त्यातील ३५ लाख ६४ हजार ९०० रुपये राेख काढून ती चाेरून नेली. चाेरट्यांनी ही मशीन कटरच्या मदतीने फाेडली असून, ही बाब कुणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून मशीन समाेरील पथदिवेही बंद केले हाेते. ही घटना रविवारी (दि. ४) मध्य रात्री घडली. वडधामना येथील तकिया परिसर हा वर्दळीचा असून, या ठिकाणी एचडीएफसी बॅंकेचे एटीएम आहे. चाेरट्यांनी रविवारी मध्यरात्री या एटीएमला लक्ष्य केले. यासाठी त्यांनी मशीनसमाेर असलेले काही पथदिवे आधी बंद केले. त्यानंतर, खाेलीत प्रवेश करून मशीनच्या मागच्या भागाला असलेली वायरिंग ताेडली. पुढे त्यांनी मशीनचा मागचा भाग गॅस कटरने कापून रक्कम ठेवण्याचे ट्रे बाहेर काढून त्यातील रक्कम लंपास केली. हा प्रकार रविवारी मध्यरात्रीपासून साेमवारी दुपारी १ वाजेपर्यंत कुणाच्याही लक्षात आला नाही, शिवाय बॅंकेची कंट्राेल रूम व एटीएमची सुरक्षा करणाऱ्यांनाही याबाबत माहिती नव्हती. सचिन चव्हाण यांना कुणीतरी दुपारी १ वाजताच्या सुमारास फाेनवरून हे एटीएम डाऊन असल्याची माहिती दिली आणि चाेरट्यांनी एटीएम फाेडून आतील रक्कम चाेरून नेल्याचा प्रकार पुढे आला. त्यामुळे या एटीएमच्या सेफ केअर कंपनीचे कंपनीचे सुपरवायझर सुशील रामराव सावरकर (३८, रा.लाकडी पूल, महाल, नागपूर) यांनी या मशीनची पाहणी करून पाेलिसात तक्रार दाखल केली.चाेरट्यांनी या एटीएममधील ३५ लाख ६४ हजार ९०० रुपये राेख चाेरून नेल्याची माहितीही त्यांनी पाेलिसांना दिली. माहिती मिळताच पाेलीस उपायुक्त नरूल हसन व ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी या मशीनची पाहणी केली. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ४६१, ३८० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.सुरक्षा वाऱ्यावरया भागात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांची अनेक एटीएम आहेत. त्या एटीएममध्ये रकमेचा नियमित भरणा केला जाताे. मात्र, काेणत्याही एटीएमजवळ बॅंक अथवा त्यांच्या सुरक्षा एजन्सीने सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केलेली नाही. याला वडधामना येथील एचडीएफसी बॅंकेचे एटीएमही अपवाद नाही. एटीएमच्या बाहेर व आत सुरक्षेच्या दृष्टीने केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, ते कॅमेरे सुरू आहेत की नाही, हे तपासण्याची तसदीही कुणी घेत नाही.

टॅग्स :atmएटीएमtheftचोरी