शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'माझा गुन्हा हुशार असणं!' : यशश्रीची सुसाईड नोट आणि व्यवस्थेची लाजिरवाणी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:34 IST

कुटुंबीयांची न्यायासाठी पायपीट: कॉलेजने आरोर्पीना प्लेसमेंटसाठी कसे उभे केले?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महाविद्यालयातील सात परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून एका हुशार विद्यार्थिनीने जीव दिल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित विद्यार्थ्यांविरोधात २०२२ मध्ये तसेच आत्महत्येनंतरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या कुकृत्यांमुळे आमच्या मुलीचा जीव गेला असून तरीदेखील महाविद्यालयाने त्यांना प्लेसमेन्टच्या प्रक्रियेत उभे केले व त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू असताना त्यांना रोजगार कसा मिळाला, असा सवाल विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

यशश्री शेंडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर वीरेंद्र सिंग (२३, अल्वर, राजस्थान), अभिषेक कुमार (२३, गया, बिहार), अन्राग सिंग (२३, लखनौ, उत्तर प्रदेश), हर्ष लोचक (२३, मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश), अनुज सिंग (२३, देवास, मध्य प्रदेश), शशांक शेखर (२३, सारण, बिहार) व शशांक पांडे (२३, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. यशश्रीने २०२० साली राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज येथे प्रवेश घेतला होता. नियमांनुसार विद्यार्थी व विद्यार्थिनींना वसतिगृहात राहणे अनिवार्य होते. तिला आरोपी विविध कारणांमुळे त्रास देत होते. काही कालावधीने त्यांची हिंमत वाढली व त्यांनी तिच्याशी अश्लील संवाद करणे, अश्लील कृत्य करणे, वसतिगृहातील खोलीत येऊन अत्याचार करण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू केले. त्यामुळे तिने में २०२२ रोजी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती व वीरेंद्र, अभिषेक तसेच अनुरागविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

आरोपींनी सर्व मुलांसमोर अश्लील कृत्य करताना खालची पातळी गाठली होती. यामुळे यशश्री तणावात होती. तिने महाविद्यालयातदेखील तक्रार केली होती. यानंतर आरोपींनी प्रवेशद्वाराच्या गार्डरूमसमोर तिचे नाव लिहीत अश्लील कमेंट्स लिहिल्या होत्या, न्यायालयात सुनावणीदरम्यानदेखील आरोपी तिच्याकडे पाहून घाणेरडे इशारे करायचे. यामुळे कंटाळून अखेर तिने तेथून प्रवेश काढला व दुसऱ्या महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेऊ लागली. ती प्रचंड तणावात गेली होती. ७ एप्रिल रोजी तिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या घरातून सुसाईड नोटमध्ये आरोपींच्या कुकृत्याबाबत लिहिले होते. वडील यशवंत शेंडे यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरोधात बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संचालकांनी दखलच घेतली नाहीतत्कालीन संचालकांनी हा प्रकार गंभीरतेने घेतलाच नाही. तिच्यासोबत झालेल्या कृत्याला व मृत्यूला कॉलेज प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप तिच्या आई सुषमा शेंडे यांनी लावला आहे. माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. बी. शिंगणे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर भाष्य करता येणार नाही असे म्हटले. तर बजाजनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आरोपींना महाविद्यालयाचे अभय असल्याचा आरोपदरम्यान, आरोपींचे शिक्षण पूर्ण झाले. तीन जणांविरोधात गुन्हा दाखल होता व न्यायालयात खटला सुरू होता. मात्र, असे असतानादेखील महाविद्यालय प्रशासनाने त्यांना प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी करून घेतले व विद्यार्थी सरकारी नोकरीतदेखील लागले. यशश्री ही महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती व तिच्या सुरक्षेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाचीच होती.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी