शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

मुत्तेमवारांचा आलेख घसरतच गेला

By admin | Updated: May 18, 2014 00:57 IST

खासदार म्हणून नागपूरचे तब्बल चार वेळा संसदेत प्रतिनिधित्त्व करणारे काँग्रेसचे खा. विलास मुत्तेमवार यांचा मतांचा आलेख प्रत्येक निवडणुकीत घसरतच गेला आहे.

घसरगुंडी :पावणेपाच लाखावरून आले तीनवर

नागपूर : खासदार म्हणून नागपूरचे तब्बल चार वेळा संसदेत प्रतिनिधित्त्व करणारे काँग्रेसचे खा. विलास मुत्तेमवार यांचा मतांचा आलेख प्रत्येक निवडणुकीत घसरतच गेला आहे. १९९८ मध्ये पाऊणे पाच लाख मते घेत एकतर्फी विजय नोंदविणार्‍या मुत्तेमवार यांना २०१४ च्या निवडणुकीत मात्र फक्त ३ लाख मतांवर समाधान मानत जळपास तेवढ्याच मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसची कमी होत गेलेली लोकप्रियता व भाजपने संघटनात्मक बांधणीवर दिलेला भर यामुळे प्रत्येक निवडणुकीत मुत्तेमवारांची क्रेझ कमी होत गेली आहे. ही मुत्तेमवारांची एकूण नववी व नागपुरातून पाचवी निवडणूक होती. गेल्या चारही निवडणुकांमध्ये मुत्तेमवार यांनी नागपुरात बाजी मारली असली तरी प्रत्येक निवडणुकीत त्यांची मते ४ ते ५ टक्क्क््यांनी कमी होत आली आहेत. १९९८ मध्ये त्यांनी मुत्तेमवार यांनी ४ लाख ८६ हजार ९२६ (५७.४१ टक्के) मते घेत भाजपचे रमेश मंत्री यांना मात दिली. त्यानंतर वर्षभराने १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री विनोद गुडधे पाटील यांनाही नमविले. मुत्तेमवार यांना ४ लाख २४ हजार ४५० मते (५२.३८ टक्के ) मिळाली. २००४ मध्ये माजी महापौर अटलबहादूर सिंग यांना भाजपने रिंगणात उतरविले. मुत्तेमवार त्यांनाही पुरुन उरले. ३ लाख ७३ हजार २६४ (४७ टक्के) मते घेतली. २००९ च्या निवडणुकीत मात्र, त्यांना भाजपचे बनवारीलाल पुरोहीत यांनी तगडे आव्हान दिले. या निवडणुकीत भाजपची मते वाढली व मुत्तेमवारांच्या मतांमध्ये मोठी घट झाली. या वेळी त्यांना ३ लाख १५ हजार १४८ मते ( ४१.७२ टक्के) मिळाली. नागपुरातून विजयाचा ‘चौकार’ मारणार्‍या मुत्तेमवारांना या वेळी मात्र भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी ‘क्लिन बोल्ड’ केले. मुत्तेमवार यांना फक्त ३ लाख २ हजार ९३९ म्हणजे २७.९० टक्के मते मिळाली. म्हणजेच मुत्तेमवारांची तब्बल साडेतेरा टक्के मते घटली.