शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुलजार यांच्या गीतांनी बहरली संगीत संध्या

By admin | Updated: May 27, 2014 01:38 IST

गीतकार व कवी गुलजार यांना अलीकडेच चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यानिमित्त समस्त रसिक श्रोत्यांतर्फे त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी

मैत्री परिवारातर्फे आयोजन : रसिकांनी लुटला आनंद

नागपूर : गीतकार व कवी गुलजार यांना अलीकडेच चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यानिमित्त समस्त रसिक श्रोत्यांतर्फे त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी प्रख्यात शेफ विष्णू मनोहर व मैत्री परिवार संस्थेतर्फे सोमवारी गुलजार यांच्या गीतांचा ‘इस मोड से...’ या संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बजाजनगर येथील ‘विष्णूूजी की रसोई’ येथे हा कार्यक्रम पार पडला. यात सचिन ढोमणे यांचे संगीत संयोजनासह सुरभी ढोमणे, मंजिरी वैद्य, सागर मधुमटके, सारंग जोशी व विष्णू मनोहर यांनी भाग घेतला होता. गुलजार यांच्या सिनेगीतांच्या बंदिनी, घर, आशीर्वाद, खामोशी, आंधी, आनंद व स्लम डॉग मिलेनियर अशा अमीट प्रसंगाच्या स्क्रीनवरील (व्हिडिओ) अनुभूतीमुळे हे सादरीकरण विशेष आनंददायी ठरले होते. गुलजार यांचे प्रत्येकच गीत म्हणजे साधे व भावपूर्ण शब्द, संगीतकारांचे सुरेल स्वर व लता, गीता दत्त, आशा, किशोरकुमार, एस. डी. बर्मन, राहुल देव बर्मन व भूपेंद्र सिंग यांच्या प्रतिभेचा उत्सवच असतो. यात सहभागी गायकांनीही तेवढ्याच मधूर, भावपूर्ण व समरसतेने २४ गीतांचा नजराणा सादर केला. सागर मधुमटके याच्या बेजोड स्वरातील ‘फिर वही रात है...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर मंजिरीने ‘मोरा गोरा अंग लेले..., बोले रे पपिहरा..., ना जिया लागे ना..., तुम्हे हो ना हो..., पिया बावरी...,अशी’ गीते सादर केली. तसेच सुरभीने ‘मेरी जाँ..., हमने देखी है इन आँखो की..., आज कल पाँव जमींपर नही पडते मेरे..., तुमसे नाराज नही जिंदगी..., ’ या गीतांसह सारंगने ‘तुम पुकार लो..., ए जिंदगी गले लगा ले...,’ सागरने ‘मुसाफिर हूँ यारो..., ओ मांझी रे अपना...’ अशी गीते सादर करून, विष्णू मनोहर यांनी ‘धन्नो की आँखो मे...’ हे भन्नाट गीत गायले. सागर व सुरभीचे ‘इस मोड से जाते है...’ आणि सारंग व सुरभीचे ‘बिती ना बिताये रैना...’ अशा युगल गीतांसह हे सादरीकरण अधिकच बहरले. या कार्यक्रमाला डॉ. मनोज साल्फेकर यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनासह सचिन ढोमणे, नंदू गोहणे, विक्रम जोशी, उज्ज्वला गोकर्ण, महेंद्र ढोले, विक्रम लिमये, प्रसन्ना वानखेडे, रिंकू निखारे, अमर शेंडे यांची सुरेल सहसंगत लाभली होती. व्यासपीठ सजावट विवेक रानडे व प्रफुल्ल मनोहर यांनी केली होती. (प्रतिनिधी)