शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

मनपाच्या सेवा तीन महिन्यात ऑनलाईन : आयुक्त तुकाराम मुंढे यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 8:27 PM

तीन महिन्यात मनपाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी ई-गव्हर्नन्स यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास व पैसा वाचणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न : पदाधिकाऱ्यांचा सपोर्ट आवश्यकच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. लहानसहान कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. तीन महिन्यात मनपाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी ई-गव्हर्नन्स यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास व पैसा वाचणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. दोन दिवसात त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासोबतच बुधवारी त्यांनी जनता दरबारच्या माध्यमातून शहरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शहर विकासाच्या दृष्टीने आवश्यक व योग्य निर्णय घेण्याचा संकल्प व्यक्त केला.महापालिकेच्या सर्व सेवा मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होतील. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याला फिडबॅक दिला जाईल, अशी ई-गव्हर्नन्स यंत्रणा सक्षम केली जाईल. राहण्यायोग्य व आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार नाही. चांगल्या दर्जाच्या शाळा, नोकरीची संधी, उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बगीचे, चांगली शहर बससेवा, अखंडित पाणीपुरवठा, चांगले रस्ते, पथदिवे, सिवरेज अशा सुविधा आवश्यक आहेत, सोबतच महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. यासाठी आर्थिक स्रोत बळकट करण्याचा मानस मुंढे यांनी व्यक्त केला.लोकल बॉडीचा सपोर्ट आवश्यकचमहापालिकेतील पदाधिकारी व प्रशासन या दोघांचेही शहर विकासाच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. विकास कामे व नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करताना प्रशासनाला लोकल बॉडीचा सपोर्ट आवश्यकच आहे. आधीच्या आयुक्तांनीही चांगले काम केले आहे. परंतु प्रत्येकाची काम करण्याची पद्धती वेगवेगळी असते. शहर विकासासाठी सर्वांचाच प्रयत्न असतो. त्यामुळे दोघांच्या कामाची तुलना करता येणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.थेट संवादातून फिडबॅक मिळतोअधिकारी, पदाधिकारी व तक्रारदार यांच्याकडून माहिती मिळते. परंतु यातील वास्तव नागरिकांशी थेट संवाद साधल्यानंतर फिडबॅक मिळतो. म्हणूनच जनता दरबार वा लोकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. यासाठी शहरातील नागरिकांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.उत्पन्न बघून खर्चशहरात मोठमोठी विकास कामे व्हावीत अशी सर्वांची अपेक्षा आहे. परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेऊनच विकास कामासाठी तरतूद करावी लागले. यात आवश्यक सुविधांच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. महापालिकेचे प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या विभागाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती मुंढे यांनी दिली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाonlineऑनलाइन