नागपुरातील कुख्यात जुबेरविरुद्ध एमपीडीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:21 IST2020-08-31T22:19:14+5:302020-08-31T22:21:24+5:30

उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड जुबेर कुरेशी करीम कुरेशी याच्याविरुद्ध पोलिसांनी एमपीडीए लावून त्याला कारागृहात डांबले.

MPDA against notorious Zubair in Nagpur | नागपुरातील कुख्यात जुबेरविरुद्ध एमपीडीए

नागपुरातील कुख्यात जुबेरविरुद्ध एमपीडीए

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड जुबेर कुरेशी करीम कुरेशी याच्याविरुद्ध पोलिसांनी एमपीडीए लावून त्याला कारागृहात डांबले. २३ वर्षीय जुबेर यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वनदेवीनगरात शिवमंदिर चौकाजवळ राहतो. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र त्याच्या वृत्तीत फरक पडला नाही. त्याची गुन्हेगारी सुरूच असल्याचे पाहून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जुबेरविरुद्ध एमपीडीएच्या कारवाईस मंजुरी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुबेरविरुद्ध एमपीडीएची कारवाई करून त्याला रविवारी कारागृहात डांबले.
नागपुरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी दोन वर्षात ५३ कुख्यात गुंडांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यासाठी परवानगी दिलीआहे, हे विशेष!

Web Title: MPDA against notorious Zubair in Nagpur