१४ वर्षांच्या मुलाच्या आईने ओलांडली चौकट; जागतिक पॉवरलिफ्टिंगमध्ये पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:49 IST2025-11-12T16:37:45+5:302025-11-12T16:49:06+5:30

Nagpur : २२ देशांतील ३९० खेळाडूंसमोर केली अव्वल कामगिरी

Mother of 14-year-old boy crosses the line; wins historic gold medal in world powerlifting! | १४ वर्षांच्या मुलाच्या आईने ओलांडली चौकट; जागतिक पॉवरलिफ्टिंगमध्ये पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक !

Mother of 14-year-old boy crosses the line; wins historic gold medal in world powerlifting!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
जागतिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत नागपूरच्या रश्मी गणेश अय्यरने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. ४ ते १० नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील डरबन शहरात आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण २२ देशांतील ३९० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या जागतिक मंचावर रश्मीने ओपन गटातील ६० किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णझळाळी प्राप्त केली.

दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर तिथल्या थंड वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान रश्मीसमोर होते. विशेष म्हणजे, तब्बल १७ तासांचा प्रवास केल्यानंतर ती डरबनमध्ये दाखल झाली आणि लगेच दुसऱ्याच दिवशी तिने मुख्य स्पर्धेत दमदार खेळ केला. सरावादरम्यान घेतलेले अथक परिश्रम आणि मनाचा निग्रह रश्मीला सुवर्णपदकापर्यंत घेऊन गेला. 

दृष्टिकोन सकारात्मक हवा

कोणताही खेळ ऑलिम्पिकमध्ये आहे म्हणूनच तो खेळायचा, असा दृष्टिकोन नसावा. जर आपण लहानपणापासूनच मुलांना खेळाचे महत्त्व समजावून सांगितले, तर त्यांच्या आयुष्यात शिस्त येते, मानसिक आरोग्य चांगले राहते, शारीरिक सुदृढता वाढते. पेशाने डॉक्टर असलेल्या रश्मीने यावेळी पालकांना आवाहन केले की, त्यांनी मुलांना खेळाकडे केवळ छंद म्हणून नाही, तर करिअर म्हणून पाहण्याची संधी द्यावी.

१४ वर्षाच्या मुलाच्या आईचा सामर्थ्यवान प्रवास

  • ऐतिहासिक कामगिरी करून मंगळवारी संध्याकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर रश्मीने 'लोकमत'सोबत संवाद साधला.
  • यावेळी ती म्हणाली की, स्त्रियांच्या सामर्थ्याविषयी समाजात असलेल्या समजुतींना आव्हान देण्यासाठी मी पॉवरलिफ्टिंगची निवड केली. वयाच्या तिशीनंतर अनेकांनी मला जाणीव करून दिली की, तुम्ही आता तितक्या मजबूत राहिलेल्या नाहीत.
  • १४ वर्षाच्या मुलाची आई असल्याने आता या वयात पॉवरलिफ्टिंगसारखा अवघड खेळ तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी वजन उचलताना मी ठरवले की, एक महिला किती सामर्थ्यवान असू शकते हे मला सिद्ध करायचे आहे.
  • कोणाशी स्पर्धा करणे हा माझा उद्देश नव्हता. पण, मला महिलांसाठी आखण्यात आलेली चौकट भेदायची होती. शासकीय नोकरीच्या मागे लागण्याऐवजी पुढच्या पिढीला फायदा होईल असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

Web Title : 14 वर्षीय बच्चे की माँ ने जीता वैश्विक पावरलिफ्टिंग में स्वर्ण!

Web Summary : नागपुर की रश्मि गणेश अय्यर ने डरबन में विश्व पावरलिफ्टिंग चैंपियनशिप में ऐतिहासिक स्वर्ण पदक जीता। 60 किलो वर्ग में भारत का प्रतिनिधित्व करते हुए, उन्होंने चुनौतियों और सामाजिक अपेक्षाओं को पार किया। पेशे से डॉक्टर, वह माता-पिता को अपने बच्चों के खेल प्रयासों का समर्थन करने के लिए प्रोत्साहित करती हैं।

Web Title : Mother of 14-year-old wins gold in global powerlifting!

Web Summary : Nagpur's Rashmi Ganesh Iyer secured a historic gold at the World Powerlifting Championship in Durban. Representing India in the 60 kg category, she overcame challenges and societal expectations. A doctor by profession, she encourages parents to support their children's athletic pursuits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर