कन्हान : भाजपकडून शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांची पळावपळवी सुरू असल्याने महायुतीत राजकारण तापले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात आले. गत आठवड्यात शिंदेसेनेच्या मंत्र्यांनीही मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कन्हान-पिंपरी नगर परिषदेत काँग्रेसने सुनेला उमेदवारी दिल्याने रुसलेल्या सासबार्डनी शिंदेसेनेत प्रवेश करीत सूनबाईच्या पराभवासाठी आता कंबर कसली आहे.
कन्हान नगर परिषदेत तिकिटाच्या नाराजीतून उफाळलेले सासू-सुनेचे हे राजकीय द्वंद्व आता चर्चेचा विषय बनले आहे. गतवेळी काँग्रेसच्या नगरसेविका असलेल्या गुंफा तिडके यांना यंदा प्रभाग ४ (ब) मधून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्याऐवजी काँग्रेसने त्यांची सून दर्शना तिडके यांना उमेदवारी दिली. यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त करीत रुसलेल्या सासूबाई गुंफा यांनी राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांना गाठत शिंदेसेनेत प्रवेश केला, तसेच सुनेला पराजयाचा झटका दाखविण्याचा निश्चयही जाहीर केला. येथे काँग्रेसच्या दर्शना तिडके यांचा सामना शिंदेसेनेच्या कविता घुले यांच्याशी होणार आहे. अशात सासू-सुनेचे हे राजकीय युद्ध कोण जिंकणार याची उत्कंठा वाढली आहे. प्रभाग ४ मध्ये सत्ताधारी, विरोधक आणि तटस्थ नागरिक या लढतीकडे डोळे लावून आहेत.
"गेल्या टर्ममध्ये काँग्रेसची नगरसेविका असताना पक्षाने मला यावेळी उमेदवारी दिली नाही. सुनेला तिकीट देत काँग्रेसने माझ्या घरात भांडण लावले. त्यामुळे येथे काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या माझ्या सुनेला हरविण्याचा निश्चय केला आहे."- गुंफा तिडके, शिंदेसेना
"आईने आम्हाला सोडले. गतवेळी सासूबाई गुंफा तिडके यांना उमेदवारी मिळविण्यापासून, तर त्यांच्या विजयापर्यंत माझा खारीचा वाटा होता. मी समाजसेवेत सक्रिय असल्याने काँग्रेसने माझ्या कामाची दखल घेत उमेदवारी दिली आहे. सासूबाईनी आमच्याशी अबोला धरून शिंदेसेनेत प्रवेश केला. राजकारणाच्या मोहामुळे सासूबाईंनी एका घराचे दोन तुकडे केले."- दर्शना निहले, काँगेस गोतनार
Web Summary : In Kanhan, a mother-in-law joined Shinde's Sena after her daughter-in-law received a Congress ticket. Upset, she aims to defeat her relative in the upcoming election, creating a notable political battle.
Web Summary : कान्हन में, बहू को कांग्रेस का टिकट मिलने से नाराज़ सास शिंदे सेना में शामिल हो गईं। आगामी चुनाव में वह अपनी बहू को हराने का लक्ष्य रखती हैं, जिससे एक महत्वपूर्ण राजनीतिक लड़ाई हो गई है।