शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नागपुरातील तलावांवर आले मंगोलियन पाहुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 11:19 AM

शहराच्या आसपास असलेल्या अनेक तलावांवर सध्या मंगोलियन पाहुण्यांचे आगमन झालेले आहे.

ठळक मुद्देमार्चपर्यंत असेल मुक्काम४००० किलोमीटरचा प्रवास करून आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या आसपास असलेल्या अनेक तलावांवर सध्या मंगोलियन पाहुण्यांचे आगमन झालेले आहे. हे मंगोलियन पाहुणे म्हणजे ‘बार हेडेड गुज’ ऊर्फ हंस पक्षी होत. युरोपातील मंगोलिया येथून सुमारे ४ हजार ५०० कि मीचा प्रवास करून आणि हिमायलयाच्या ३० हजार फूट उंचावरून हे पक्षी अन्नाच्या शोधात भारतात दाखल झाले आहेत आणि सध्या त्यांचा मुक्काम हा जिल्ह्यातील तलावांवर राहणार आहे.पक्षीतज्ज्ञांच्या मते सप्टेंबर, आॅक्टोबरच्या काळात जगभरातील पक्ष्यांच्या नैसर्गिक स्थलांतराची प्रक्रिया सुरू होते. मात्र वातावरणात झालेल्या बदलामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरणावरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी आॅक्टोबरच्या सुरुवातीच्या काळ हा मंगोलियन बार हेडेड गुज पक्ष्यांच्या आगमनाचा काळ मानला जातो. मात्र यावर्षी स्थलांतरणात महिनाभर उशीर झाला असून हे पक्षी डिसेंबर महिन्यात दाखल झाले आहेत. जीवनासाठी आवश्यक भोजन, पर्यावरण, प्रजनन आणि पिल्लांच्या पालन पोषणासाठी पोषक वातावरण शोधण्यासाठी हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून योग्य अधिवास शोधत असतात. हे स्थलांतरण विशिष्ट काळासाठी असते. बार हेडेग गुज पक्षी उन्हाळ्याच्या दिवसात युरोप तसेच तिबेटच्या भागात दिसून येतात. मात्र थंडी वाढली की मंगोलिया, सायबेरिया, रशिया, अलास्का, युरोप व कजाकिस्तान आदी उत्तर धु्रवाकडील देशांमध्ये या कालावधीत मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असल्याने या पक्ष्यांचे स्थलांतरण सुरू होते आणि हे पक्षी हजारो किमीचा प्रवास करून आणि हिमालय पर्वत पार करून दक्षिण भारताकडे येतात. यानंतर प्रजनन कार्य व संगोपनासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर जिल्ह्यातील तलावांवर त्यांचा अधिवास असतो.या भागात आहे मुक्कामपक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील मटकाझरी, सायकी, वडगाव आदी तलाव पाण्याने भरलेले असतात. यामुळे आवश्यक असलेला अधिवास आणि खाद्यपदार्थ मिळत असल्याने या पक्ष्यांचा मुक्काम या भागात असतो. या पक्ष्यांचे थवे सध्या नागरिकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य