शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

आमदार,खासदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 9:06 PM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजने’चा लाभ आमदार, खासदार आणि सरकारी कर्मचाऱयांना मिळणार नसल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देअर्थमंत्री जयंत पाटील : मे पर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजने’चा लाभ आमदार, खासदार आणि सरकारी कर्मचाऱयांना मिळणार नसल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.अधिवेशनाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात कर्जमाफीचे स्वरुप आणि व्याप्तीबाबतची माहिती पाटील यांनी दिली.कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱयांना कोणताही अर्ज भरण्याची गरज राहणार नाही. त्याने केवळ ज्या बँकेतून पीक कर्जाची उचल केली आहे. ते बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी. मार्चनंतर या खात्यात सरकारकडून पैसे वळते केले जातील आणि त्याला कर्जमाफीचे प्रमाणपत्र संबंधित बँकेकडून मिळेल अशी माहिती पाटील यांनी दिली.राज्यातील शेतकऱयांनी मार्च २०१५ नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी सरकारच्यावतीने भरुन त्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. याच कालावधीमध्ये उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकीची रक्कमसुध्दा या योजनेसाठी पात्र राहील, असे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले होते. लांबलचक फॉर्म भरावा लागला होता. ऑनलाईनची डोकेदुखी सोसावी लागली होती. या योजनेत तसे काही नसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल, हे पुढील दोन महिन्यात स्पष्ट होईल. मात्र गतवेळच्या सरकारपेक्षा ही कर्जमाफी मोठी असेल असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असलेले जे लोकप्रतिनिधी शेतकरी असतील ते या योजनेसाठी पात्र राहतील असे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.मार्च २०२० पासून योजनेचा लाभ थेट शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येईल. मे अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. गृहमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ.नितीन राऊत, काँग्रेस नेते आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.आशिष जयस्वाल,आ.अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलFarmerशेतकरी