आमदार विकास ठाकरे नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 15:46 IST2023-02-18T15:42:37+5:302023-02-18T15:46:19+5:30
विधिमंडळ सचिवालयाद्वारे पत्र जारी

आमदार विकास ठाकरे नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) आमदार विकास ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम २८ (२) (ब) अन्वये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात येते. विधानसभेचे सदस्य पंकज भोयर यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. आता विधानसभा अध्यक्षांनी उर्वरित दुसऱ्या जागेवर आ. विकास ठाकरे यांची विद्यापीठ अधिसभेवर नामनिर्देशन केले आहे. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाद्वारे पत्र जारी करण्यात आले आहे.