आमदार रविंद्र धंगेकर पहिल्याच दिवशी सरकारला घेरणार; ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 11:38 AM2023-12-07T11:38:54+5:302023-12-07T11:40:19+5:30

ललित पाटील प्रकरण हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजणार आहे.

MLA Ravindra Dhangekar will surround the government on the very first day Demanded action against ministers in Lalit Patil case | आमदार रविंद्र धंगेकर पहिल्याच दिवशी सरकारला घेरणार; ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी

आमदार रविंद्र धंगेकर पहिल्याच दिवशी सरकारला घेरणार; ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी

नागपूर-  गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालतून आरोपी ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचे प्रकरण समोर आले होते. ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू केली आहे. आता हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजणार आहे. पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारचे लक्ष वेधले आहे.

नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार?

आमदार रविंद्र धंगेकर यांनी विधान भवन परिसरात ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार धंगेकर यांनी ही मागणी लावून धरली आहे. यामुळे आता हिवाळी अधिवेशनातही या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे. 

ससून रुग्णालयातील तत्कालीन अधिष्ठाता यांच्यावर असलेला राजकीय वकदहस्त या प्रश्नांकडे आमदार धंगेकरांनी लक्ष वेधले आहे. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, ललित पाटील या आरोपीने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज रॅकेट चालवले आहे. याबाबत आम्ही कारवाईची मागणी केली आहे. ललित पाटील याला नऊ महिने चांगली सेवा दिली. पोलीस, डॉक्टरांशी संगनमत ठेवून त्याने अवैद्य धंदा सुरू ठेवला. यात त्याने करोडो रुपयांचा व्यवहार केला. आम्ही आवाज उठवूनही संजीव ठाकूर यांना अटक केलेली नाही, संजीव ठाकूर यांना अटक झाल्यानंतर ज्या, ज्या मंत्र्यांनी फोन केला त्याचा तपास झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली. 

"ललित पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर अनेक कारखाने उद्धस्त केले आहेत. तो मंत्री नेमका कोण आहे हा तपासा भाग आहे. सर्वजण राजकारणात अडकले आहे, पण जनतेसाठी काम केले पाहिजे, मी सातत्याने जनतेसाठी काम केले आहे. ललित पाटील प्रकरणासाठी मी या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही आमदार धंगेकर यांनी सांगितले. 

Web Title: MLA Ravindra Dhangekar will surround the government on the very first day Demanded action against ministers in Lalit Patil case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.