शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

‘नॅक’साठी विद्यापीठाचे ‘मिशन ए प्लस’ : विनायक देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:10 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर सद्यस्थितीत ‘नॅक’ मूल्यांकनाचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विद्यापीठाला जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या तयारींवर जोर देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी दिली.

ठळक मुद्देमूल्यांकनासाठी तयारी सुरू, रिक्त पदे भरण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर सद्यस्थितीत ‘नॅक’ मूल्यांकनाचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विद्यापीठाला जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या तयारींवर जोर देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी दिली.डॉ.देशपांडे यांनी मंगळवारी कार्यकारी प्र-कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारली. बुधवारी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुढील कार्याची भूमिका विषद केली. विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागांसोबतच शैक्षणिक विभागांच्या विकासावरदेखील लक्ष देण्यात येईल. याची तयारी सुरु झाली आहे. परीक्षा विभागाच्या कामाला आणखी पारदर्शक व वेगवान बनविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. समस्या दूर व्हावी यासाठी शिक्षकांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदेदेखील याचप्रमाणे भरण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.अगोदर आम्ही ‘आऊटसोर्सिंग’बाबत विचार केला होता. मात्र नंतर मनपरिवर्तन केले. परीक्षा विभागाचे काम गोपनीय असते. अशा स्थितीत एखाद्या खासगी कंपनीला जबाबदारी देणे धोकादायक ठरु शकते. पदभरतीसाठी बैठका सुरु आहेत व लवकरच काहीतरी उपाय नक्कीच समोर येईल, अशी माहितीदेखील डॉ.देशपांडे यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठEducationशिक्षण