शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच

By admin | Updated: November 18, 2014 00:51 IST

गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नात ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग

सतीश वटे : पर्यावरणाचा अपमान न करण्याचा विद्यार्थ्यांना सल्लानागपूर : गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नात ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) मोलाचा वाटा राहणार आहे. या मोहिमेसाठी ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’चा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ १५ महिन्यात तयार करण्याचे आव्हान आमच्या संशोधकांपुढे असून, कुठल्याही परिस्थितीत ‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच, असा विश्वास ‘नीरी’चे संचालक डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केला. स्वरसाधना व सरकारी आणि गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने श्रीमंत पूर्णचंद्र बुटी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ह्यआपली वसुंधराह्ण या पर्यावरण प्रदर्शनादरम्यान त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी ‘नीरी’शी संबंधित निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकलापवित्र गंगा नदीत होणारा सांडपाण्याचा निचरा थांबविण्याचे सर्वात कठीण आव्हान आहे. गंगा स्वच्छता योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ‘नीरी’कडे ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘नीरी’चे वैज्ञानिक अगदी गोमुखापासून ते हुगलीपर्यंत ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’संदर्भातील निरनिराळ्या बाबींवर अभ्यास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त ‘नीरी’च्या देशभरात सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला.‘नीरी’च्या संशोधन प्रकल्पांत विद्याशाखेचा फार मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. निरनिराळ्या विद्याशाखा अन् संशोधन हे दोघेही एकमेकांना पूरक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति जागरूकता निर्माण करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान डॉ. वटे यांनी सांगितले. ‘नीरी’ सदैव नागपूरसाठी कार्यरत राहील, असे ते म्हणाले. शुभांगी रायलू यांनी डॉ.वटे यांची मुलाखत घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी व निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागपूर तूर्तास सुरक्षित, पण...नागपुरात प्रदूषणाची स्थिती काय आहे, यासंदर्भात डॉ.वटे यांना विचारणा केली असता त्यांनी सखोल उत्तर दिले. आजच्या तारखेत नागपुरात वायू तसेच जलप्रदूषणाची पातळी इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे. परंतु भविष्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर, नागरिकांनी पुढाकार घेऊन घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. जर पर्यावरणाचा अपमान केला तर निसर्गदेखील तुम्हाला सोडणार नाही, या शब्दांत त्यांनी भविष्यातील धोक्यांची कल्पना उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.