अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 14:00 IST2022-07-20T13:41:04+5:302022-07-20T14:00:01+5:30
काही काळापासून कल्पेश विद्यार्थिनीवर लग्नासाठी दबाव टाकू लागला. मात्र तो बेरोजगार असल्याने तिने त्याला नकार दिला.

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
नागपूर : हवाई क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीची आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपिंग करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कपिल नगर पोलिसांनी आरोपी अल्पेश राजपाल शेंडे (२२ रा. पंचशील नगर) याला अटक केली आहे.
१७ वर्षीय विद्यार्थिनीची आरोपीशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे रुपांतर मैत्रीत झाले. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार अल्पेशने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढळे. दोघेही सोबत फिरायला लागले. यादरम्यान अल्पेशने विद्यार्थिनीची व्हिडिओ क्लिपिंग तयार केली.
काही काळापासून तो विद्यार्थिनीवर लग्नासाठी दबाव टाकू लागला. कल्पेश बेरोजगार असल्याने तिने त्याला नकार दिला. त्यानंतर नातेवाईकांना क्लिपिंग पाठवण्याची धमकी देत अल्पेशने आक्षेपार्ह वर्तन करण्यास सुरुवात केली. वैतागलेल्या विद्यार्थिनीने कपिल नगर पोलिसात तक्रार दाखल केली. अल्पेशवर विनयभंग, धमकावणे आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.