शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

मन व मनगट घडली पाहिजेत

By admin | Updated: January 11, 2015 00:47 IST

देशाच्या रक्षणासाठी मन घडले तरच मनगट घडतील. मनाला घडविण्याचे अलौकिक कार्य नामदेवांनी केले. तर पावनखिंडीत अडकलेल्या छत्रपती शिवरायांना मनगटाच्या बळावर

श्रेयस व मानसी बडवे यांनी गुंफले दुसरे पुष्प नागपूर : देशाच्या रक्षणासाठी मन घडले तरच मनगट घडतील. मनाला घडविण्याचे अलौकिक कार्य नामदेवांनी केले. तर पावनखिंडीत अडकलेल्या छत्रपती शिवरायांना मनगटाच्या बळावर बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणाची बाजी लावत आपल्या शूर राजाला वाचविले, असे विचार कीर्तन महोत्सवातील दुसरे पुष्प गुंफतांना श्रेयस व मानसी बडवे यांनी कीर्तन जुगलबंदीत सादर केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती, राधा गोविंद ट्रस्ट यांच्यावतीने चिटणीस पार्क मैदानावर आयोजित कीर्तन महोत्सवातील कीर्तनाचे दुसरे पुष्प अर्पण करताना पुणे येथील युवापिढीतील नामवंत कीर्तनकार श्रेयस व मानसी बडवे यांनी गुंफले. शनिवारी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी ब्रह्मस्थानंद, दत्ता महाराज, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सुदर्शन शेंडे व आ. अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. आजची आरती शैलेष व आरती कुलकर्णी आणि अनिल व शालिनी मानापुरे यांच्या हस्ते पार पडली. कीर्तन परंपरेतील अत्यंत रंजक असा प्रकार म्हणजे कीर्तन जुगलबंदी. नागपूरकर रसिकांना कीर्तन जुगलबंदीचा प्रकार बडवे दाम्पत्यांनी अत्यंत खुबीने सादर करीत बाजीप्रभू देशपांडे व संत नामदेव यांचे चरित्र सादर केले. कीर्तन जुगलबंदी सादर करतांना सवालजवाब करतानाच पुढच्या व्यक्तीच्या विचारांचे खंडन-मंडन करण्याची प्रथा आहे. यावेळी पूर्वरंग सादर करताना संत तुकारामांच्या दास सहाय्य नारायण अभंगातील पदाचे निरुपण केले. देव हा भक्तांचा पाठीराखा असून त्याच्या मदतीला धाव घेणारा आहे, अशी भूमिका श्रेयस बडवे यांनी मांडली. त्यावर उत्तर देतांना देव भक्तांना मदत करण्यापेक्षा भक्तच देवाच्या मदतीला येतो, असे सांगत हनुमंताचे उदाहरण दिले. हनुमंताने सीतेचा शोध लावला. सेतू बांधला, लक्ष्मणास संजीवन बुटी आणून देत त्याचे प्राण वाचविले. तसेच जनाबाईचा अभंग ज्याने वदिला ‘हो आपला मामा, तो येईल का आपल्या कामा’ हा अभंग सादर करीत ज्याने आपल्या मामाचा वध केला. तो कृष्ण आपल्या कामी येणार का, असा सवाल केला. भक्तच देवाला मोठे करीत असतो हे पटवून देत असतानाच बाजीप्रभू होते म्हणून शिवाजी वाचले. भक्त होता म्हणून देव वाचला. यावर भक्तांसाठी देव कुठल्याही रूपात अवतरतो. भक्ताच्या हातून जे ही कार्य घडतं त्याची बुद्धी भगवंतच भक्ताला देत असतो. असे सांगत भगवंताचा भक्ताशी असलेला संबंध अधोरेखित केला. यावेळी यमन रागातील राम कृष्ण हरीने सुरुवात करतांना अनेक भक्तिगीते व भावगीते ही त्यांनी सादर केली. आज देशासाठी मरण्याची नाही तर जगण्याची गरज आहे. साध्या-साध्या गोष्टी व प्रवृत्तींशी लढण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांतून प्रेरणा घेत आपले कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय विषयावर चिमटे काढत कीर्तन रंगविले. (प्रतिनिधी)