शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणे... २७ टक्के उमेदवार आहेत कोट्यधीश

By योगेश पांडे | Updated: November 12, 2024 17:15 IST

सर्वाधिक श्रीमंत उमेदवाराकडे १५४ कोटींची संपत्ती : २२ % उमेदवार लाखाच्या आत

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष व उमेदवारांकडून पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. यंदा नागपूरच्या रिंगणात धनाढ्य उमेदवारांची संख्या वाढली असून, तब्बल २७ टक्के उमेदवारांची संपत्ती एक कोटी किंवा त्याहून अधिक आहे. सर्वाधिक श्रीमंत उमेदवार अपक्ष असून, त्याची संपत्ती तर १५४ कोटी इतकी आहे. दुसरीकडे २२ टक्के उमेदवारांची मालमत्ता एका लाखाच्या आत आहे. 

निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. 'लोकमत'ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूरमध्ये सहाही मतदारसंघातून एकूण ११७ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ३२ उमेदवारांची संपत्ती एक कोटी किंवा त्याहून अधिक आहे. कोट्यधीशांपैकी ११ जणांची संपत्ती, तर पाच कोटींहून अधिक असून, दोन उमेदवारांची मालमत्ता ५० कोटींहून जास्त आहे.

याशिवाय २६ उमेदवारांची मालमत्ता एक लाख किंवा त्याहून कमी आहे. दोन जणांकडे काहीच मालमत्ता नसल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. काही जणांची मालमत्ता तर १५ हजारांच्या आतदेखील आहे.

१३ अपक्ष कोट्यधीश नागपुरातील सर्वांत जास्त संपत्ती असलेला उमेदवार अपक्ष आहे. १३ अपक्षांची संपत्ती एक कोटी किंवा त्याहून अधिक आहे. मात्र, एकूण कोट्यधीशांमध्ये राजकीय पक्षांच्याच उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. उमेदवार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या स्थावर व जंगम मालमत्ता विचारात घेऊन एकूण मालमत्ता दर्शविण्यात येते, हे विशेष.

३७ टक्के उमेदवारांचे उत्पन्न 'शून्य'तब्बल ४४ (३७ टक्के) उमेदवारांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे निरंक म्हणजेच दाखविले आहे. तर एका उमेदवाराने त्याचे वार्षिक उत्पन्न १ हजार १६० रुपये दाखविले आहे. अशा स्थितीत हे उमेदवार तांत्रिकदृष्ट्या बीपीएल' गटात मोडायला हवेत. २७ उमेदवारांचे उत्पन्न ५ लाख ते १० लाखांच्या दरम्यान आहेत. ३ उमेदवारांचे उत्पन्न वार्षिक ५० लाखांहून अधिक असून दोघांचे उत्पन्न एक कोटीहून जास्त आहे. 

उत्तर, पश्चिममध्ये सर्वाधिक कोट्यधीशनागपूर उत्तर व नागपूर पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी कोट्यधीश उमेदवार आहेत. त्याखालोखाल दक्षिणमध्ये सहा पूर्वमध्ये पाच, तर दक्षिण-पश्चिममध्ये तीन उमेदवारांची संपत्ती एक कोटीहून अधिक आहे. दक्षिण व पश्चिम नागपुरातील प्रत्येकी सहा उमेदवारांची मालमत्ता एका लाखाहून कमी आहे. तर दक्षिण पश्चिम व मध्यमधील प्रत्येकी चौघे उमेदवार या मालमत्ता गटात मोडतात. 

उमेदवारांची एकूण मालमत्तामालमत्ता                                 उमेदवारांची संख्या१ लाखाहून कमी                              २६ १ लाख ते १० लाख                           २७ १० लाख ते २५ लाख                         १० २५ लाख ते ५० लाख                         ८ ५० लाख ते १ कोटी                          १४ एक कोटीहून अधिक                        २१ पाच कोटींहून अधिक                        ११

उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न                             उमेदवारांची संख्या शून्य                                                   ४४ १ ते १ लाख                                           १ १ लाख ते ५ लाख                                 २७ ५ लाख ते १० लाख                               २८ १० लाख ते २५ लाख                              ६ २५ लाख ते ५० लाख                              ६ ५० लाख ते १ कोटी                                ३ एक कोटीहून अधिक                              २

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारणnagpurनागपूर